-->
महंत गोपालव्यास कपाटे व डॉ. रवींद्र भोळे यांचा सन्मान शिवाजी कांचन यांच्या हस्ते.

महंत गोपालव्यास कपाटे व डॉ. रवींद्र भोळे यांचा सन्मान शिवाजी कांचन यांच्या हस्ते.



साप्ताहिक "जनता की आवाज"
      वृत्तपत्र प्रतिनिधी.
 
पुणे/उरुळी कांचन :- उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या दक्षता कमिटीच्या सदस्यपदी महंत गोपालव्यास कपाटे महानुभाव यांची, तर उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण कमिटीवर सदस्यपदी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 
.             किल्लेदार ही पुस्तक भेट करतांना 

उरुळी कांचन नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक शिवाजी कांचन यांच्या हस्ते महंत गोपालव्यास कपाटे महानुभाव व डॉ. रवींद्र भोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सामाजिक, आध्यात्मिक तसेच जनसेवेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.नवनियुक्त सदस्यांच्या माध्यमातून पोलीसप्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय अधिक दृढ होण्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यासाठी सकारात्मक योगदान मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 याप्रसंगी शिवाजी कांचन यांनी दोघांचे अभिनंदन करुन, आपल्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा उपयोग जनसेवेसाठी करून भविष्यातही उल्लेखनीय कार्य घडावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व जनहिताच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार सुनिलराव तुपे पाटील, महासुपर फास्टच्या संपादिका सुवर्णा कांचन, महाराष्ट्री भूमीचे पत्रकार बापुसो चौधरी उपस्थित होते.

0 Response to "महंत गोपालव्यास कपाटे व डॉ. रवींद्र भोळे यांचा सन्मान शिवाजी कांचन यांच्या हस्ते."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article