-->
साकोलीतील सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या गणेश मंडळाचा व्हीएसएफ ग्रुपतर्फे सन्मान...

साकोलीतील सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या गणेश मंडळाचा व्हीएसएफ ग्रुपतर्फे सन्मान...


          युगांतर बारगसाडे 
"साप्ताहिक"जनता की आवाज" 

साकोली :- शहरातील एकोडी रोड, सिव्हिल वॉर्ड परिसरातील 'सर्व समाज श्री गणेश उत्सव मंडळ मार्केटचा राजा' हे सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविणारे गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते. या मंडळात हिंदू, मुस्लिम, बौद्ध तसेच महिला-पुरुष बांधव एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करीत असून, मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये सर्व समाजबांधवांचा सहभाग असतो. विशेष म्हणजे मंडळात हिंदू बांधवांसह मुस्लिम व बौद्ध समाजातील पदाधिकारीही कार्यरत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त येथे मोठ्या उत्साहात महाप्रसादाचे रोजी सकाळी ८ वाजता आरतीच्या प्रसंगी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजन करण्यात येते आणि हजारो भक्त-भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. शहरासह तालुक्यात कौमी एकतेचे प्रतीक ठरलेल्या या सर्व समाज श्री गणेश उत्सव मंडळातील पदाधिकारी व सदस्यांचा व्हीएसएफ युनिट समूह अर्थात व्हीआयपी ग्रुप, साकोली मीडिया सआणि फ्रिडम यूथ फाऊंडेशन यांच्या वतीने शुक्रवार, दि. १८ रोजी सकाळी ८ वाजता आरतीच्या प्रसंगी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

या मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यासाठी
व्हीएसएफ युनिट समूहाने पुढाकार घेतला. यावेळी कार्यक्रमाचे संचालन डी. जी. रंगारी यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बागडे, उपाध्यक्ष राहुल राऊत तसेच महिला पदाधिकारी गीता बागडे, चंदा केरझरे, प्रीती चौबे, ज्योती दुबे, राणी पांडे, कविता शेंडे, सुनंदा आशिष टेकाम, कोषाध्यक्ष अतुल डोंगरे आणि सचिव इरशाद पठाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्वामी नेवारे, सुमित उंदीरवाडे, पुजारी अमन चौबे (शास्त्री), सावन चौबे, आधारस्तंभउत्तमजी गोडशेलवार, मनोज पटेल, हरीदास केरझरे, अनिल बागडे, लिलाधर चौबे, विजय साखरे, आकाश तिवारी, नवीन अग्रवाल,

भंडारा जिल्हा पोलीस व्हीआयपी ग्रुप

वरकडे, कविता वरकडे, गीता टेकाम, अलवीना पठाण, सीमा चौबे आणि जुबेदा पठाण यांचेही स्वागत व अभिनंदन करण्यात आले. हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतर समाजबांधव एकत्रितपणे कार्यरत असलेल्या या सर्व समाज श्री गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी व्हीएसएफ युनिट समूहाचे अनिल कापगते, आशिष चेडगे, किशोर बावणे, अंकीत कापगते, चंद्रशेखर कापगते, ऋग्वेद यवल,कीशोर रंगारी, युगांतर बारसागडे, प्रविण कांबळे, मुकेश पंचभाई, मनिष झिंगरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

0 Response to "साकोलीतील सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या गणेश मंडळाचा व्हीएसएफ ग्रुपतर्फे सन्मान..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article