लोकपरिवर्तन फॉउंडेशन तर्फे जि. प. प्राथ. शाळा केसलवाडा येथे वृक्षारोपण
सोमवार, 21 सितंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पंचायत समिती पवनी अंतर्गत अड्याळ केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा येथे लोकपरिवर्तन फॉउंडेशन च्या वतीने शनिवार (ता. 19 सप्टेंबर )ला वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा ढवळे ह्या होत्या. मुख्य मार्गदर्शक म्हणून लोकपरिवर्तन फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष रजत राऊत हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संघर्ष करियर अकॅडमी अड्याळ चे संचालक कृपाल ढवळे, आरोग्यसेवक गोपाल ब्राह्मण, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे भंडारा जिल्हा संघटक जयेंद्र चव्हाण, आंगणवाडी सेविका माया गजभिये, आशा स्वयंसेविका पौर्णिमा बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनिषा ढवळे त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात अशोका नामक रोपट्यांचे रोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना रजत राऊत म्हणाले की, वाढत्या तापमानाचा आणि प्रदूषणाचा विचार करता प्रत्येक व्यक्तीने एक रोपटं लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका मनिषा ढवळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन जयेंद्र चव्हाण यांनी केले. तर आभार कृपाल ढवळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता अल्पेष मंगर,ज्ञानदीप टेंभुर्णे,
संदिप कुंभारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Response to "लोकपरिवर्तन फॉउंडेशन तर्फे जि. प. प्राथ. शाळा केसलवाडा येथे वृक्षारोपण "
एक टिप्पणी भेजें