८२ लाखांची एलसीडी दोन महिन्यांपासून बंद..
सोमवार, 21 सितंबर 2026
Comment
• वीजपुरवठा खंडित; ५० हजारांची थकबाकी,जबाबदारीवरून संभ्रम.
युगांतर बारसागडे साप्ताहिक
"जनता की आवाज़"
साकोली :- शहरातील नागरिकांना जाहिराती तसेच विविध शासकीय व सार्वजनिक माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष नागरी सुविधा योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या चार एलसीडी गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. वीजबिल थकीत राहिल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुमारे ८२ लाख रुपये खर्चुन उभारलेली ही यंत्रणा सध्या नागरिकांच्या उपयोगाऐवजी शोभेची वस्तू ठरली आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून लाखांदूर रोड, एकोडी रोड, नागझिरा रोड आणि प्रगती कॉलनी या चार ठिकाणी एलसीडी उभारण्यात आल्या आहेत. उपलब्ध एका माहितीनुसार, एलसीडीसाठी सुमारे २१ लाख रुपये खर्च झाला असून, चारही एलसीडींसाठी अंदाजे ८२ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. एलसीडीवर जाहिराती प्रसारित करण्यासाठी नगरपरिषदेने निविदा प्रक्रिया राबवून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचे कंत्राट दिल्याची माहिती आहे. सुरुवातीला जाहिरातींचे प्रसारणही सुरू झाले होते.
मात्र, त्यानंतर चारही एलसीडींचे मिळून सुमारे ५० हजार रुपयांचे वीजबिल.खर्च भागविणे कठीण
साकोली शहरातील मर्यादित जाहिरातदार आहेत. यामुळे पालिकेला अपेक्षित जाहिरातदार मिळत नसल्याचेही पुढे आले आहे. परिणामी जाहिरातींतून मिळणाऱ्या उत्पन्नातून वीजबिल आणि संचालनाचा खर्च भागविणे कठीण जात आहे. याकडे पालिकने लक्ष देणे गरजेचे आहे.
झाल्याने वीज विभागाने पुरवठा खंडित केला. वीजबिल भरण्याची जबाबदारी नगरपरिषदेची की कंत्राटदाराची, याबाबत स्पष्टता नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. कंत्राटातील अटींनुसार जबाबदारी निश्चित न झाल्याने दोन महिन्यांपासून
مم
वीजबिलाची जबाबदारी नेमकी कोणाची, कंत्राटातील अटी काय आहेत आणि जाहिरातींतून किती उत्पन्न मिळाले, याची माहिती जाहीर झाली पाहिजे.
नयन पटेल, नगरसेवक.
सार्वजनिक निधीतून उभारलेली सुविधा बंद राहणे गंभीर असून, प्रशासनाने तातडीने जबाबदारी निश्चित करून एलसीडी सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.
संदीप बावनकुळे,
नगरसेवक
0 Response to "८२ लाखांची एलसीडी दोन महिन्यांपासून बंद.."
एक टिप्पणी भेजें