-->
बाबासाहेब एक गुढ आहे..

बाबासाहेब एक गुढ आहे..


संकलन :-प्रदीप कडबे  संग्राहक :- हर्षवर्धन देशभ्रतार 

बाबासाहेब एक गुढ आहे 
साऱ्या जगातील शास्त्रज्ञांनी 
विचारवंतांनी उलगडण्याचा प्रयत्न केला 
पण अजून पर्यंत ते गुढ उकलत नाही!!

बाबासाहेब एक कोडं आहे 
विश्वातील साऱ्या हुषार डोकेबाज 
लोकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला 
पण अजून पर्यंत कोणालाच हे कोडं 
सोडविता आलेले नाही!!

बाबासाहेब एक कठीण गणित आहे 
जगातील साऱ्या गणित तज्ञांनी 
आणि अर्थ शास्त्रज्ञानी हे गणित 
सोडवण्याचा प्रयत्न केला तरी 
हे गणित सोडविता येत नाही!!

बाबासाहेब हे एक ज्ञानाचे भांडार आहे 
विश्वातील साऱ्या अभ्यासकांनी 
आणि साहित्यिकाने हे ज्ञानाचे भांडार 
उपसण्याचा प्रयत्न केला तरी 
हे ज्ञानाचे भांडार कमी होत नाही!!

    नागनाथ डोलारे 
जेष्ठ साहित्यिक, पनवेल

0 Response to "बाबासाहेब एक गुढ आहे.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article