-->
शंकरपटातील 'बादशाह' कन्हैय्या काळाच्या पडद्याआड.

शंकरपटातील 'बादशाह' कन्हैय्या काळाच्या पडद्याआड.


• शर्यतीच्या मैदानातील वेगवान 'बादशाह' ला अखेरचा निरोप..

        युगांतर बारसागडे
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

साकोली :- जिल्ह्याच्या शंकरपट शर्यतीत मासलमेटा

येथील 'कन्हैय्या - गैस हंडा ग्रुप' या प्रसिद्ध बैलाने वेगवान बैल म्हणून आपली छाप सोडली होती. वेग आणि रुबाबाने ओळख निर्माण करणाऱ्या या लाडक्या कन्हैय्याचे रविवारी दुःखद निध-ान झाले.

शंकरपट प्रेमी अशोक पटले यांचा हा कन्हैय्या म्हणजे मासलमेटा गावाची शान होता. सर्वोच्च न्यायालयाच्या अटी-शर्तीचे पालन करून शर्यती सुरू झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पर-राज्यातून बैल खरेदी केले, त्याचप्रमाणे किसानपुत्र अशोक पटले यांनी 'किसन-कन्हैय्या' जोडी खरेदी करून आणली. पटले कुटुंबाने या जोडीला पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावला आणि शर्यतीसाठी सज्ज केले. या हंगामात किसन-कन्हैय्या जोडीने तब्बल २५ शर्यतींमध्ये २१ वेळा प्रथम क्रमांक पटकावला. साकोली तालुक्यातील सातलवाडा, एकोडी तसेच तुमसर तालुक्यातील सुकळी येथील अटीतटीच्या शर्यतीत १ नंबरसाठी पराभव पत्करावा लागला, तर पिं-पळगाव/सडक येथे २ नंबरवर पराभूत व्हावे लागले. अशा या विजयी कन्हैय्याच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमींवर शोककळा पसरली आहे.

'कन्हैय्या फक्त बैल नव्हता, तर तो आमच्या घरचा सदस्य होता. त्याने आमच्या गा-वाचं नाव मोठं केलं,' असे भावनिक मनोगत अशोक पटले यांनी व्यक्त केले. या दुःखद प्रसंगी सर्व शंकरपट प्रेमी, बैलगाडा मालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून अखेर चा निरोप देउन श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन समस्त गैस हंडा ग्रुप मासलमेटा, अशोक पटले, प्रभाकर पटले, महेश पटले, इंजि. विकास पटले व कु. तन्मय पटले यांनी केले आहे.

0 Response to "शंकरपटातील 'बादशाह' कन्हैय्या काळाच्या पडद्याआड."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article