सामाजिक कार्यकर्त्याकडून अपघातग्रस्त दिव्यांग पत्रकारास आर्थिक मदत.
शुक्रवार, 18 सितंबर 2026
Comment
• व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनी चा पुढाकार.
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
लाखनी :- दिव्यांग पत्रकार नरेंद्र मेश्राम रा.मचारना हे आपले कामे आटोपून सायकलने स्वगावी जात असतांना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वरांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने सायकला धडक दिल्याने दिव्यांग पत्रकार नरेंद्र मेश्राम डांबरी रस्त्यावर पडल्याने पायाचे हाड मोडल्याने गंभीर जखमी झाले घटनास्थळाचे आजूबाजूला असणाऱ्यांनी अपघाताची माहिती कुटूंबियांना दिली उपचारासाठी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनी च्या प्रयत्नाने कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचेवर तात्काळ शस्त्रक्रिया केली.त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचाराचा खर्च सांभाळण्यास ते असमर्थ असल्याची व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनी यांना माहिती होतास त्यांना संघटनेद्वारा आर्थिक मदत करण्यात आली.तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांचे पत्रकार कालिदास खोब्रागडे, खुशाल भुरे, कल्याण राऊत, शैलेश उरकुडे,रवी धोत्रे, चंदन मोटघरे, अतुल नागदेवें, शमीम आकबानी, अनिल शेंडे यांनी भेटी घेऊन दिव्यांग पत्रकार नरेंद्र मेश्राम यास आर्थिक मदत करण्याची विनंती केली.
व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखा लाखनीच्या पदाधिकाराच्या विनंतीस मान देऊन सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम, भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे लाखनी तालुका युवक आघाडी अध्यक्ष यशवंत खेडीकर,पंचायत समिती लाखणीचे गटविकास अधिकारी संदीप पानतावणे तसेच स्वामी स्पोर्ट्स अँड कनट्रॅकशन लाखनीचे प्रोपाटर. तथा सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांनी आर्थिक मदत केली ती दिव्यांग पत्रकार नरेंद्र मेश्राम यांचे स्वगृही जाऊन मचारनाचे उपसरपंच सोमेश्वर कुथे, ग्रा.पं. सदस्या मालता चवळे यांचे प्रमुख उपस्थितीत त्यांचे सुपुर्द करण्यात आले. हि बाब तालुक्यात माहिती होताच व्हीओएम तालुका शाखा लाखनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Response to "सामाजिक कार्यकर्त्याकडून अपघातग्रस्त दिव्यांग पत्रकारास आर्थिक मदत."
एक टिप्पणी भेजें