महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी.
बुधवार, 2 सितंबर 2026
Comment
• तेलारा येथील विविध क्षेत्रातील कलावंत, साहित्यिक व विचारवंतांची उपस्थिती.
अमरावती विभाग विशेष पत्रकार
सदानंद मोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अकोला/तेल्हारा :- समता कला संस्कृती बहुउद्देशीय संस्था तथा महादेव वामनदादा कर्डक जयंती उत्सव समिती. त्याला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेलारा येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटा साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला तळागाळातील कलावंत, साहित्यिक, विचारवंत, वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच उपासक-उपाशी का मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाकवी वामनदादा कर्डक यांचे साहित्यिक व सामाजिक योगदानाचे स्मरण करून यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष भाऊराव रौंदळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक शाहीर मुरलीधर लोणावळे महाराज, जिल्हा सदस्य खर्च, राजश्री शाहू महाराज जेष्ठ कलावंत मानधन योजना, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रख्यात गायक सारंग दादा फुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रवींद्र विरघट अध्यक्ष, समता कला संस्कृती बहुउद्देशीय संस्था गाडेगाव, डीजे वानखडे, संपादक, समता नायक, शाहीर विजय पांडे, सप्त खंजेरी वादक, शाहीर गणेश इंगळे अकोला, महाराष्ट्र पुरस्कारा प्राप्त कवी देवराव तेलगोटे, अकोट यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला भारतीय आठवले, अशोक भाऊ दारोकार, केशवराव ताथोड, रवींद्र दामोदर, भीमराव तायडे, संतोष दामोदर, सुरेश राहणे, गोपाल झुने, संजय मासाळ, संघर्ष बोदडे, देविदास तायडे, तेजराव गवई, उत्तम गवई, राहुल तायडे, गजानन तायडे, बाळू पोहरकर, स्वराज दामोदर, सुमेध गवई, रवी दामोदर, धम्मपाल दामोदर, लक्ष्मण दांडगे, स्वप्निल गवई, गौरव गवई, विजय निकाळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद मोरे, राहुल गवई, संगपाल दामोदर, रविभाऊ दामोदर, रवींद्र विरघट, यांच्यासह समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर पोहेकर ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त यांनी केले. यावेळी विविध कलावंतांनी आपल्या कला सादरीकरणातून महाकवी वामनदादा कर्डक, यांच्या विचारधारांना व साहित्यिक वारसाला अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला
0 Response to "महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी."
एक टिप्पणी भेजें