-->
नाली साफ करा वादातून सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे व दिलीप कांबळे यांच्या मारहाणीत दिलीप कांबळे यांचा मृत्यू.

नाली साफ करा वादातून सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे व दिलीप कांबळे यांच्या मारहाणीत दिलीप कांबळे यांचा मृत्यू.


• साकोली तालुक्यातील खैरी येथील घटना, सरपंच फरार
   संजीव भांबोरे 
"साप्ताहिक "जनता की आवाज" 

भंडारा :- दिलीप सदाशिव कांबळे वय 62 वर्ष यांच्या घरासमोरील नाली कचरा बुजलेला आहे. नालीतून पाणी जात नाही त्यामुळे नाली साफ करा असे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांना सांगण्यात आले  . त्यावरून वाद झाला .डोक्याला गंभीर मारहाण झाल्यामुळे   दिलीप कांबळे यांचा 11 दिवसानंतर मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे की,
  दिलीप कांबळे तो समाजाप्रती होतकरू व्यक्त होता .
वलमाझरी  गट ग्रामपंचायत असून खैरी हा गाव वालमाझरी गट ग्रामपंचायत मध्ये येतो.

खैरी येथील दिनांक 11 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलीप  सदाशिव कांबळे  नाली साफ करण्यावरून सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्यासोबत भांडण झाले.  या वादावादीत सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी दिलीप कांबळे यांना खूपच मारहाण केली .त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याच्या छातीवर बसून मारहाण करून त्याला पाडले व त्याला जबरदस्त डोक्याला मार लागला. त्याला पहिल्या दिवशी दुखापत वाटत नसल्यामुळे तो स्वतःच्या घरी होता. परंतु दुसऱ्या दिवशी  गुप्त डोक्याला त्रास होत असल्यामुळे साकोली दवाखान्यात भरती करण्यात आले. त्यामुळे प्रकृती बिघडल्यामुळे भंडारा येथे भरती करण्यात आले. त्यानंतर सिरीयस असल्यामुळे त्याला नागपूरला हलवण्यात आले .
काल दिनांक 21 सप्टेंबरला दिलीप कांबळे मृत्युमुखी पडला असल्याची वार्ता  गावात पसरली.

पोलीस विभाग जागा झाला. लगेच तात्काळ दखल घेऊन आपल्या तपासाची चक्रे गतिमान केली  .जसं मृत्यूची बातमी मिळाली त्याचवेळी लगेच सरपंच फरार झाला.  ही बातमी वंचित बहुजन आघाडीला मिळतात
वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी जी रंगारी व जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, यादो राव गणवीर ,गणेश गजभिये तात्काळ त्या गावी पोहोचले व मृतकाच्या पत्नीची मुलाची मुलाखत घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेतले.

वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की ,सरपंच आरोपीवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा .पोलीस स्टेशन साकोली येथे अनुसूचित जाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर सायंकाळी 5 वाजता वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी जी रंगारी, वंचिताचे किशोर तागडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे व थानेदार महादेव आचरेकर यांची भेट घेऊन तपासाची चक्र लवकर फिरवा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करा   अशी मागणी त्यांच्यासमोर करण्यात आली. डीवायएसपी आणि ठाणेदार यांनी सांगितले की माहिती मिळाली तेव्हापासून आम्ही तपासाचे चक्र फिरवली असून थोडीशी आम्ही कसूर केलेली नाही . त्या आरोपीचा मोबाईल स्विच आहे .गाडी नंबर घेऊन त्यांच्या तपासाची चक्र सुरू आहेत असं पोलीस उपविभागीय अधिकारी व थानेदार महादेव आचरेकर 
   यांनी प्रतिनिधीला माहिती दिली. प्रेत नागपूरलाच असून पोस्टमार्टम झाल्यानंतर गावाकडे येणार आहे. न्यूज लिहीपर्यंत  प्रेत आली नव्हती
सर आरोपीला अटक करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे पोलीस स्टेशन समोर  प्रेत ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

0 Response to "नाली साफ करा वादातून सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे व दिलीप कांबळे यांच्या मारहाणीत दिलीप कांबळे यांचा मृत्यू."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article