-->
लोक जनशक्ती पार्टी पक्षप्रवेश सोहळा उत्साहात.

लोक जनशक्ती पार्टी पक्षप्रवेश सोहळा उत्साहात.

                  युगांतर बारसागडे 
        साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- येथील विश्रामगृहात आज दिनांक 20 /9 /2026 रोजी दु. 2.00 वा जिल्ह्यात लोक जनशक्ती पार्टीची स्थापना करून पक्ष प्रवेश सोहळा विश्रामगृहात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

 या पक्ष सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष सतीश भाऊ लोणारे सोबतच प्रमुख अतिथी म्हणून पक्षाच्या महिला आघाडीच्या विदर्भ प्रदेश अध्यक्ष सौ.कुसुम सिंग ठाकूर आणि श्री.मनोहर गणेश विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तसेच इस्माईल भाई उपस्थित होते. सामाजिक कार्येकर्ते मनोज खोब्रागडे,युगांतर बारसागडे,लोकशाहीर अंबादास नागदेवे,प्रबोधनकार रवी बाबू भवसागर यांची ही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या स्मृतीस वंदन करून करण्यात आली.कार्यक्रम सोहळ्याची प्रास्तावना लोकशाहीर अंबादास नागदेवे यांनी केली.

 संपूर्ण मान्यवरांनी पक्षाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे असल्यामुळे जिल्ह्यात केंद्रातून अनेक योजना आपण जिल्ह्यात राबवू तसेच अनेक सोयी सुविधा भंडाऱ्यातील जनतेला देऊ असे आश्वासन विदर्भ प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ लोणारे साहेब यांनी दिले.तसेच या प्रवेश सोहळ्यात जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वानुमते श्रीकांत नागदेवे यांची निवड करण्यात आली.
 असून जिल्हा महासचिव पदी राजेंद्र लांजेवार तर उपाध्यक्ष युगांतर बारसागडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख /मीडिया प्रभारी प्रकाश नाकतोडे, भंडारा तालुका अध्यक्ष हनीफ शेख, महासचिव संजय नागदेवे, उपाध्यक्ष रवींद्र माला धारे, भंडारा शहर अध्यक्ष मुस्ताक भाई पठाण,लाखांदूर तालुका अध्यक्ष सुधीर खोब्रागडे,तुमसर तालुका अध्यक्ष राजेंद्र गजभिये,महासचिव नामदेव निखाडे,मोहाडी तालुका अध्यक्ष वामन गायधने,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर सोहळ्याला जिल्ह्यातील शेतकरी, कामगार,लोककला वंत, सह प्रचंड प्रमाणात जनसंख्या होती.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश नाकतोडे यांनी केले तर आभार पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी मानले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय नागदेवे,गंगाधरजी धोत्रे राजूभाऊ गजभिये,नामदेव निखाडे, फकीरा खडसे, हनीफ शेख, वामन गायधने, जयश्री नागदेवे , विमल शरनागत, शांतकला शरनागत, वंदना शरनागत,मीराबाई फंदे, प्रमिला पारधी,सचिन पोटभरे, निलेश शेलकर,हरिदास मेश्राम, आनंदराव बावणे इत्यादींनी सहकार्य केले.

0 Response to "लोक जनशक्ती पार्टी पक्षप्रवेश सोहळा उत्साहात."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article