-->
साकोलीतील "सर्वधर्मसमभाव" असलेले एकमेव गणेश मंडळ व्ही एस एफ ग्रुफ तर्फे सम्मानित •

साकोलीतील "सर्वधर्मसमभाव" असलेले एकमेव गणेश मंडळ व्ही एस एफ ग्रुफ तर्फे सम्मानित •



• हिंदू,मुस्लिम' महिला बांधव एकत्र आहेत मंडळात सदसगण.

युगांतर बारसागडे 
साप्ताहिक "जनता की आवाज़" 

 साकोली  :- शहरातील एकोडी रोड, सिव्हिल वार्ड स्थित सर्व समाज गणेश उत्सव मंडळ, "मार्केट चा राजा" हे एकमेव गणेशोत्सव मंडळ आहे की, येथे हिंदू मुस्लिम पुरुष महिला बांधव हा सण एकत्र येऊन साजरा करतात. विशेष म्हणजे या गणपती मंडळात हिंदू बांधवांसह मुस्लिम , बुद्ध पदाधिकारी सुद्धा आहेत.

 व मोठ्या उत्साहाने येथे महाप्रसाद तयार करून हजारो भक्तभाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. शहरातच नव्हे तर तालुक्यात या गौरवशाली आणि एकमेव कौमी एकतेचे प्रतिक ठरलेल्या सर्व समाज श्री गणेश उत्सव मंडळातील पदाधिकारींचा "व्ही एस एफ युनिट समुह" म्हणजे व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन वतीने शुक्रवार 18 सप्टेंबरला स. 8 ला आरतीच्या प्रसंगी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे प्रथमच या एकमेव मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यासाठी पुन्हा अग्रगण्य असलेली "व्ही एस एफ" युनिट समुहाने पुढाकार घेतला आहे. 

      या सत्कार प्रसंगी संचालन डी. जी. रंगारी यांनी केले. येथे या अभिनव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बागडे, उपाध्यक्ष आशिष टेकाम, कोषाध्यक्ष अतुल डोंगरे, सचिव इरशाद पठाण या पदाधिकारींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आणि इतर पदाधिकारी स्वामी नेवारे, सुमित उंदीरवाडे, पुजारी अमन चौबे ( शास्त्री ), सावन चौबे, आधारस्तंभ उत्तमजी गोडशेलवार, मनोज पटेल, हरीदास केरझरे, अनिल बागडे, लिलाधर चौबे, विजय साखरे, आकाश तिवारी, नविन अग्रवाल, राहूल राऊत तसेच महिला पदाधिकारी गीता बागडे, चंदा केरझरे, प्रीती चौबे, ज्योती दुबे, राणी पांडे, कविता शेंडे, सुनंदा वरकडे, कविता वरकडे, गीता टेकाम, अलवीना पठाण, सीमा चौबे, जुबेदा पठाण यांचे सुद्धा येथे स्वागताभिनंदन करण्यात आले. 
     समाजातील हिंदू 'मुस्लिम 'बौद्ध आणि इतर समाजबांधव एकत्र असलेल्या या एकमेव "सर्व समाज श्री गणेश मंडळ" पदाधिकारींचा सत्कार प्रसंगी आयोजन "व्ही. एस. एफ" युनिट समुहाचे अनिल कापगते, आशिष चेडगे किशोर बावणे, अंकीत कापगते, चंद्रशेखर कापगते, ऋग्वेद येवले, किशोर रंगारी, युगांतर बारसागडे, प्रविण कांबळे, मुकेश पंचभाई, मनिष झिंगरे व इतर परीसरात नागरिक उपस्थित होते.

0 Response to "साकोलीतील "सर्वधर्मसमभाव" असलेले एकमेव गणेश मंडळ व्ही एस एफ ग्रुफ तर्फे सम्मानित •"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article