-->
अड्याळ बस स्टॉप परिसरातील महिला व पुरुष मुत्रीघर समस्यांचे माहेरघर.

अड्याळ बस स्टॉप परिसरातील महिला व पुरुष मुत्रीघर समस्यांचे माहेरघर.


 

• सरपंच शिवशंकर मुंगाटे यांना पत्रकार संजीव भांबोरे यांनी दूरध्वनी वरून संपर्क करून बस स्टॉप परिसरातील महिला व पुरुष मुत्रीघर समस्यांचे विषय सांगीतले.

• नव्याने टायलेट ,पाणी ,व मुत्रीघर बांधण्याबाबत केली चर्चा ,सोमवारपासून कामाला सुरुवात करण्याचे दिले आश्वासन.

         संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील सर्वात मोठी १२ हजार लोकसंख्या असलेल्या अड्याळ येथील बसस्थानकाच्या मागे महिला व पुरुषांकरिता मुत्रीघर असून त्या मुत्रीघरांची अत्यंत दयनीय अवस्था आहे .याबाबत पत्रकार संजीव भांबोरे यांनी दूरध्वनीवरून ६.३० सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्याशी संपर्क करून महिला व पुरुष यांचे करिता असलेले मुत्रीघराची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
, त्याचप्रमाणे कचरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपण या मुत्रीघराकडे तात्काळ लक्ष घालून त्या ठिकाणी नव्याने सार्वजनिक मुत्रीघर, शौचालय, पाण्याची व्यवस्था करण्याबाबत अवगत केले. याबाबतीत सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी सकारात्मक उत्तर देऊन सोमवारपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याची आश्वासन पत्रकार संजीव भांबोरे यांना दिले. 
याकडे अड्याळवाशी व परिसरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

0 Response to "अड्याळ बस स्टॉप परिसरातील महिला व पुरुष मुत्रीघर समस्यांचे माहेरघर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article