-->
प्रगती कॉलोनी पहाडी रेस्ट हाऊस वरील खिडक्या दरवाजे गेले चोरीला.

प्रगती कॉलोनी पहाडी रेस्ट हाऊस वरील खिडक्या दरवाजे गेले चोरीला.


 

• रेस्ट हाऊस नवीन बनविण्याची मागणी :- वंचित बहुजन आघाडीची मागणी.

         संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- प्रगती कॉलनी जवळील उंच पहाडी एक निसर्गरम्य पहाडी आहे .त्या पहाडीवर एक चांगल्या प्रकारच्या रेस्ट हाऊस दहा-पंधरा वर्षांपूर्वी होता. तिथे चांगले व्हीआयपी लोक मुक्कामा ने असायचे . त्या ठिकाणी खिडक्या दरवाजे लोकांनी चोरून नेलेले आहेत. वरचा छत सुद्धा तुटलेला आहे.
त्या ठिकाणी खराब व भंगार अवस्था झालेली आहे. तुटलेल्या रेस्ट हाऊस वर काही जोडपे अश्लील चाळे अशी तक्रार आलेली आहे. तो पहाडी परिसर एवढा निसर्ग रम्य आणि सुंदर वाटतय. तिथे फिरताना एकदम आनंद वाटतो. फ्रेश वाटतं. सुंदर अवस्थेत या रेस्ट हाऊस ची अवस्था आहे. याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे,मुलीच लक्ष नाही आहे. भरपूर लोक
रोज सकाळी फिरायला जातात. व्यायाम प्राणायाम करतात. वनविभागाचे आर एफ ओ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा हा प्रकरण लोकप्रतिनिधी नानाभाऊ पटोले यांच्याकडे पण सांगितलेला आहे असे असताना सुद्धा या ठिकाणी का बरं वेळ लागत आहे हे पण लक्षात घेण्यासारखे बाब आहे.
 त्यामुळे ताबडतोब नवीन रेस्ट हाऊस बनविण्यात यावा आणि जाण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा खडीकरण करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा महासचिव डी जी रंगारी केली आहे. या निवेदनावर भंडारा जिल्हा महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, यादोराव गणवीर, अमित नागदेवे,गणेश गजभिये, शितल नागदेवे, प्रशिक मोटघरे, जितेंद्र मेश्राम, गीता वलथरे, त्रिवेणी मेश्राम, रेखा रामटेके यांच्या सह्या आहेत.

0 Response to "प्रगती कॉलोनी पहाडी रेस्ट हाऊस वरील खिडक्या दरवाजे गेले चोरीला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article