विर्शीतील "एक गाव एक गणपती" परंपरेने रौप्य महोत्सवाचा उच्चांक गाठला.
मंगलवार, 22 सितंबर 2026
Comment
• गावात होतो प्रत्येक उत्सवात "एक गाव एक मुर्ती" • व्ही एस एफ समुहाने केले पदाधिकारींना सन्मानित.
युगांतर बारसागडे
साप्ताहिक "जनता की आवाज"
साकोली २१ सप्टेंबर :- साकोली तालुक्यातील विर्शी गावच्या नवयुवक सार्व. गणेशोत्सव मंडळाने एकत्र येऊन कुठलाही राजकीय हेतू न ठेवता गावात "विर्शीचा राजा" हा एकमेव मंडळ स्थापन करून एकात्मेचे दर्शन घडवून आणले. आणि या गणेशोत्सवाला २५ वर्ष पूर्ण होऊन २६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अश्या या आदर्श गणेशोत्सव मंडळात "व्ही. एस. एफ" ने भेट दिली व तेथील पदाधिकारींचा सत्कार युनिट समुह वतीने ( सोमवार २१ सप्टेंबर ) ला करण्यात आला.
विशेष म्हणजे या गावात श्री गणेशोत्सव, दुर्गात्सव, शारदोत्सव स्थापना हे सुद्धा एकत्र येऊन एकच ठिकाणी स्थापन करून श्रध्देने उत्सव साजरा करतात. विर्शीची लोकसंख्या ४ हजार असुन या ठिकाणी सर्वधर्मीय लोक एकत्र राहुन गावातील प्रत्येक उत्साहाला गुण्यागोविंदाने सहभाग घेतात. सातत्याने येथे ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, मॅरेथॉन स्पर्धा, व्यसनमुक्ती व आरोग्य विषयक मार्गदर्शन यांचे सुद्धा आयोजन होत आहे.
या तालुक्यात आदर्श ठरलेल्या नवयुवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी अध्यक्ष तुळशीराम बोरकर, उपाध्यक्ष प्रभाकर भालेकर व सचिव तेजराम वाघाडे यांचा साकोली शहरातील व्ही एस एफ युनिट म्हणजे व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर पदाधिकारी कोषाध्यक्ष सदाशिव लंजे, सहसचिव विलास कापगते, कार्यवाह डॉ. दिपक कापगते, चुन्नीलाल काशिवार, संतोष बोरकर, विनोद सोनवाने यांचेही स्वागत अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच लिलाधर सोनवाने, पोलीस पाटील नंदलाल गहाणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष यशवंत टेंभुर्णे, पत्रकार दुर्गेश राऊत, भिवराज लांजेवार, राजकुमार पराते, सुखदेव इलमकर यांसह मंडळातील सर्व पदाधिकारी हजर होते.
सदर एक गाव एक गणपती मंडळाच्या सत्काराचे आयोजन "व्ही एस एफ" युनिट समुहाचे अनिल कापगते, किशोर बावणे, आशिष चेडगे, अंकित कापगते, युगांतर बारसागडे, मनिष झिंगरे, मुकेश पंचभाई यांनी केले होते. या सत्कार सोहळ्यात संचालन युनिट समुहाचे डी. जी. रंगारी यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार किशोर रंगारी यांनी मानले. यावेळी विर्शी गावातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला मंडळांची विशेष उपस्थिती होती.
0 Response to "विर्शीतील "एक गाव एक गणपती" परंपरेने रौप्य महोत्सवाचा उच्चांक गाठला."
एक टिप्पणी भेजें