बघेडा फाट्याजवळ दुचाकी अमोरा समोर धडकली.
बुधवार, 23 सितंबर 2026
Comment
• सहा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यु.
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- तालुक्यातील बघेडा फाट्याजवळ पवनारखारी येथे गणपती पाहायला जाणारे व पाहुन परत येणाऱ्या दुचाकी अमोरा समोर धडकल्या व यात सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला व पाँच गंभीर जखमी झाले.
अपघात हा आज 22 सप्टेंबर रात्री दहा वाजे दरम्यान घडला हे सर्व तुमसर येथील गौतम व कुंभारे नगरातील (जुन्या ईंदूताई शाळेजवळील) आहेत मृतक बालकाचे नाव ऋषभ मोहन मडावी असुन तो पहिल्या वर्गात होता. यात मृतक ऋषभ चा मामा गंभीर जख्मी आहे बाकी किरकोळ असल्याची माहीती मिळाली घटनेत एकाच बालकाचा मृत्यू झालेला आहे.
0 Response to "बघेडा फाट्याजवळ दुचाकी अमोरा समोर धडकली."
एक टिप्पणी भेजें