जिल्हा अध्यक्ष सुधाकर सिंगारे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्याची भेट.
- जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंगारे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन, दिव्यांगांच्या व्यथा मांडल्या..
साप्ताहिक जनता की आवाज वृत्तपत्र प्रतिनिधी
जळगाव :- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मा. सुधाकरजी सिंगारे यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील दिव्यांगांची अडचणी समजून घेत, जसे की बस रेल्वे मध्ये कन्सेशन, दिव्यांग महामंडळातून मिळणारे ऋण, व्यवसायासाठी मिळणारे पत्रे, राखीव भरती, घर टॅक्स मध्ये सूट, ५% निधी, इ. तसेच दिव्यांगांची मिळणारे संजय गांधी निराधार योजनेची रक्कम नऊ महिन्यापासून प्रलंबित होती त्यामुळे दिव्यांगाना उदर निर्वाहासाठी मोठा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तहसीलदारांना अनेक वेळा भेटी घेऊन सुद्धा उडवा-उडवी चे उत्तर मिळत असल्यामुळे त्यांची दखल घेऊन जिल्ह्यातील अनेक दिव्यांगनां एकत्र करून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयच्या दालनात मुलाखाती साठी गेले असता प्रशासकीय मीटिंग असल्यामुळे, उशीर का?. होईना मा. जिल्हाधिकारी साहेब यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन दिव्यांगांच्या अडचणी समजावून प्रश्न?. मांडत, दिव्यांगांचे व्यथा मांडल्या व जिल्हाधिकारी साहेब यांनी गांभीर्याने घेत तहसीलदारांना फटकारले व दिव्यांगांच्या अडचणी दूर करण्याची आश्वासन दिले.
0 Response to "जिल्हा अध्यक्ष सुधाकर सिंगारे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्याची भेट."
एक टिप्पणी भेजें