-->
रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करा वीजपुरवठ्याचे वेळापत्रक व निर्बंध जाहीर करावे.

रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करा वीजपुरवठ्याचे वेळापत्रक व निर्बंध जाहीर करावे.


           नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

लाखनी :- आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वी-जपुरवठा उपलब्ध होणार की नाही, तसेच वीजपुरवठ्यासंदर्भात शासनाकडून कोणत्या अटी व शर्ती लागू केल्या जाणार आहेत, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा सरपंच संघटनेने पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कृषर्षी वीजपुरवठ्याबाबतची भूा-मका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इंटवले यांची स्वाक्षरी आहे.
रख्वी हंगामात गहू, हरभरा व इतर पिकांच्या सिंचनासाठी वेळेवर वीजपुरवठा होणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, बीज पुरवठ्याचे वेळापत्रक, संभाव्य निबंध आणि शासनाच्या अटी-शर्ती याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना

पीक नियोजन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ऐन हंगामात बीज पुरवठ्याबाबत अनिश्चितता राहिल्यास त्याचा थेट परिणाम पेरणी, सिंचन आणि शेतीच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन, सि-'चनाचे वेळापत्रक आणि आर्थिक तरतूद करता यावी, यासाठी कृषी विभाग व महावितरण कंपनीने आगामी रब्बी

जिल्हा प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी

रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने महत् वाचा असल्याने कृषी वीजपुरवठ्याबाबत कोणतीही अनिश्चितता राहू नये. शेतकऱ्यांना वेळेत आणि स्पष्ट माहिती मिळाल्यास त्यां ना शेतीचे नियोजन करणे शक्य होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी भंडारा जिल्हा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले यांनी केली आहे.

हंगामातील कृषी वीजपुरवठ्याचे वेळापत्रक, संभाव्य निबंध तसेच शासनाच्या लागू होणाऱ्या अटी-शर्ती यांची माहिती तातडीने लेखी स्वरूपात जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयाबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक निर्देश द्यावेत आणि शेतकऱ्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनाच्या प्रती लोकप्रतिनिधींनाही या निवेदनाच्या प्रती भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, खासदार प्रशांत पडोळे, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार नाना पटोले, आमदार राजूभाऊ कारेमोरे, विधानपरिषद सदस्य परिणय फुके आणि आमदार अभिजित वंजारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

0 Response to "रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करा वीजपुरवठ्याचे वेळापत्रक व निर्बंध जाहीर करावे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article