जांभळी शाळेत वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध उपक्रम उत्साहात.
बुधवार, 7 अक्टूबर 2026
Comment
• चित्रकला, रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
युगांतर बारसागडे
साप्ताहिक "जनता की आवाज"
सडक अर्जुनी :- वन्यजीव सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, जांभळी/दोडके येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, सडक अर्जुनी व एफडीसीएम कार्यालय, जांभळी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन व निसर्गरक्षणाचे संदेश कलाकृतींतून मांडले. तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
चित्रकला स्पर्धत स्वराज विठ्ठल दहिफळे प्रथम, आस्था हिरालाल इडपाते द्वितीय तर मयंक जितेंद्र बावणे तृतीय आले. रांगोळी स्पर्धत आस्था इडपाते (गट) प्रथम, कल्याणी बावणे द्वितीय तर कृतिका बोपचे तृतीय ठरले. विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, एफडीसीएमचे अधिकारी डी. ए. सूर्यवंशी, आर. यू. गजभिये, जी. आर. माळी यांच्यासह अधिकारी, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले.
0 Response to "जांभळी शाळेत वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध उपक्रम उत्साहात."
एक टिप्पणी भेजें