-->
नवरात्राच्या महाप्रसादातून ३०० ते ४०० जणांना विषबाधेचा संशय!...

नवरात्राच्या महाप्रसादातून ३०० ते ४०० जणांना विषबाधेचा संशय!...

• खराशी येथे उलटी-जुलाबाने खळबळ; पाच रुग्ण भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविले.

नरेद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- लाखनी तालुक्यातील खराशी येथे नवरात्रोत्स- वानिमित्त आयोजित महाप्रसादाचे सेवन केल्यानंतर सुमारे ३०० ते ४०० गावकऱ्यांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.
बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी पहाटेपासून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्ह्यासह स्थानिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
 प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.खराशी येथील जितेंद्र बोंद्रे यांच्या निवासस्थानी नवरात्रोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ६०० ते ७०० नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मात्र, त्यानंतर पहाटेपासून अनेक कुटुंबांतील नागरिकांना उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला रुग्णांनी पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दिवस उजाडताच रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली.

आरोग्य यंत्रणा तातडीने सेवेत..

घटनेची माहिती मिळताच भंडारा जिल्हा आरोग्य विभागाला सतर्क करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. हलमारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कापसे यांनी रुग्णालयासह बाधित भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

खराशीचे सरपंच योगेश झलके आणि जागरूक नागरिकांनी बाधितांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पुढाकार घेतला. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली.
पाच रुग्ण भंडाराऱ्यात हरविले.

बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पालांदूर ग्रामीण रुग्णालयात ४६ रुग्णांची नोंद झाली होती. प्रकृती अधिक बिघडलेल्या पाच रुग्णांना पुढील उपचारांसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुपारपर्यंत सर्व बाधित रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.

महाप्रसादानंतर शेकडो नागरिकांना त्रास सुरू झाल्याने खराशी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

0 Response to "नवरात्राच्या महाप्रसादातून ३०० ते ४०० जणांना विषबाधेचा संशय!..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article