-->
समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.साक्षी अतकरी आर.डी.सी. परेड हैदराबाद शिबिराकरिता निवड.

समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.साक्षी अतकरी आर.डी.सी. परेड हैदराबाद शिबिराकरिता निवड.


नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

लाखनी :- दिनांक 22 /10 /2016 स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था अंतर्गत समर्थ महाविद्यालय लाखनी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कु. साक्षी श्रीकृष्णा अतकरी या विद्यार्थिनीची दिल्ली येथे होणारी दिनांक 26 जानेवारी 2027 प्रजासत्ताक परेड ( आर. डी. सी. परेड) हैदराबाद करिता महाराष्ट्रातून निवड झाली. याकरिता कु. साक्षी आतकरी हिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. बंडू चौधरी, प्रा. लालचंद मेश्राम,, प्रा. मनीषा मदनकर, माजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. धनंजय गिरीपुंजे व महाविद्यालयातील सर्व घटकांनी अभिनंदन केले.
 सदर आर.डी.सी .परेड हे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या समक्ष होणाऱ्या परेड करिता ही निवड असून यासाठी विविध शिबिरात सहभागी होत निवड होत असते. यात साक्षी श्रीकृष्ण आतकरी विद्यापीठ स्तरीय आर.डी.सी परेड नागपूर येथे राज्यस्तरीय आर.डी.सी परेड संभाजीनगर येथे पार पाडले यातून समर्थ महाविद्यालयातील साक्षी श्रीकृष्णा आतकरी हिचे हैदराबाद येथे दिनांक 13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत होणाऱ्या आर.डी.सी परेड करिता निवड झाली आहेत.याशिबिरात महाराष्ट्रातील 37 विद्यार्थी सहभागी होणार असून त्यात समर्थ महाविद्यालयातील साक्षी श्रीकृष्णा आतकरी ही सहभागी होणार आहे तिने घेतलेल्या परिश्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

0 Response to "समर्थ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.साक्षी अतकरी आर.डी.सी. परेड हैदराबाद शिबिराकरिता निवड."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article