भंडारा जिल्ह्याचा खेळाडू अंकुश सोनवाने महाराष्ट्र आट्यापाट्या संघात तर महाराष्ट्र प्रशिक्षक म्हणून प्राची चटप ची निवड.
रविवार, 4 अक्टूबर 2026
Comment
• जिल्ह्यात अभिनंदनाचा वर्षाव..
संजीव भांबोरे
साप्ताहिक "जनता की आवाज"
भंडारा :- आट्यापाट्या असोसिएशन च्या वतीने ३३ वी मुले व २६ वी मुली सबजुनिअर राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धा दिनांक २ ते ५ ऑक्टोंबर २०२६ ला हैदराबाद ( तेलंगणा ) येथे आयोजित करण्यात आली आहे.
सेलु परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड झालेले राष्ट्रीय खेळाडू अंकुश सुधाकर सोनवणे व प्रशिक्षक म्हणून कु. प्राची केशव चटप यांची निवड करण्यात आली आहे.
खेळाडूने आपला निवडीचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष राजेश धुर्वे, सचिव श्याम देशमुख, महिला समाज विद्यालयाच्या मुख्याघ्यापिका वैशाली धारस्कर (गजभिये), क्रीडा शिक्षक राजेंद्र हेडाऊ व सर्व शिव छत्रपती अवार्ड प्राप्त खेळाडू, आजी- माजी खेळाडू तसेच आई-वडिलांना दिले आहे.
भंडारा जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत .
0 Response to "भंडारा जिल्ह्याचा खेळाडू अंकुश सोनवाने महाराष्ट्र आट्यापाट्या संघात तर महाराष्ट्र प्रशिक्षक म्हणून प्राची चटप ची निवड."
एक टिप्पणी भेजें