-->
महात्मा ज्योतिबा फुले ब. उ. विकास मंडळ तुमसरच्या १३ सदस्यीय कार्यकारणीची निवडणूक संपन्न.

महात्मा ज्योतिबा फुले ब. उ. विकास मंडळ तुमसरच्या १३ सदस्यीय कार्यकारणीची निवडणूक संपन्न.


         
संजीव भांबोरे
 साप्ताहिक "जनता की आवाज"
 
भंडारा :- महात्मा ज्योतिबा फुले बहु. विकास मंडळ हे भंडारा जिल्ह्यातील कृतिशील मंडळ असून दरवर्षी या मंडळाकडून गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार माळी समाजातील अधिकारी व पदाधिकारी सत्कार, वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते.
 महत्त्वाचे म्हणजे सन २००७ पासून प्रत्येक वर्षी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. आतापर्यंत या मंडळाकडून शेकडो गरीब व गरजू लोकांच्या मुला-मुलीचे सामूहिक विवाह करून देऊन त्यांचा संसार सुखाच्या केलेला आहे. विवाह सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना संसारोपयोगी विविध प्रकारचे वस्तू व साहित्य मंडळाकडून भेट दिल्या जाते. याशिवाय अनेक सामाजिक व सेवाभावी कार्य मंडळातर्फे लोक वर्गणी गोळा करून केली जातात.

        या मंडळाच्या कार्यकारणीतील १३ सदस्यांची निवड प्रक्रिया आज दिनांक ०४ ऑक्टोबर २०२६ रोजी मंडळाचे पूर्व अध्यक्ष ताराचंदजी कटनकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे, अध्यक्ष राधेश्याम आमकर, उपाध्यक्ष कुसुमताई कांबळे,

सचिव जोशी नेरकर,सहसचिव विनोद कांबळे ,कोषाध्यक्ष शंकर गिरडकर, सदस्य- शंकर राऊत ,ताराचंद कटकर, सेवकराम किरणापुरे ,यादवराव बोरकर, चैतराम बनकर, रामप्रसाद नेरकर, देवराम राऊत ,यांचा समावेश आहे.

0 Response to "महात्मा ज्योतिबा फुले ब. उ. विकास मंडळ तुमसरच्या १३ सदस्यीय कार्यकारणीची निवडणूक संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article