-->
आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता वृक्षारोपणाची गरज- पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे.

आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता वृक्षारोपणाची गरज- पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे.

• लोकपरिवर्तन फाउंडेशन च्या उपक्रमात पहेला येथे मार्गदर्शन 

संजीव भांबोरे 
साप्ताहिक "जनता की आवाज"
 
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम लोक परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पहेला येथे घेण्यात आला.

.      मा.पोलीस निरिक्षक व पत्रकार संजीव भांबोरे 
 
सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना अड्याळ येथील पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे म्हणाले की ,आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता झाडे लावा ,झाडे जगवा ही संकल्पना राबवून आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता पर्यावरणाची गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या यामिनीताई बांडेबुचे होत्या. कार्यक्रमाचे आयोजक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. 

यावेळी लोक परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रजत राऊत, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक वानखेडे, कृपाल ढवळे, अतुल वानखेडे, सनराइज कॉम्पुटर चे संचालक विलास बांडेबुचे, दिलीप आकरे, पंकज आकरे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक कुमारी संजना संजीव भांबोरे यांनी केले.

0 Response to "आरोग्य सुदृढ ठेवण्याकरिता वृक्षारोपणाची गरज- पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article