-->
तिरुपती विद्यालय रेंगोळा येथे डाॅ. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन साजरा.

तिरुपती विद्यालय रेंगोळा येथे डाॅ. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन साजरा.


      नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज"
 
 भंडारा :- लाखनी तालुक्यातील तिरुपती विद्यालय तथा स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालय रेंगोळा /मांगली येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देवराम फटे तर प्रमुख पाहुणे म्हणून स. शिक्षक मनोहर सुरसाऊत, उत्तमराव माने, ग्याणिराम धनगर, टेकराम भेसारे, उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पुस्तकांचे वाचन करून नवनवीन संकल्पना व त्याचे महत्व वाचनातून स्पष्ट होते. यावेळी विदयार्थ्यांनी वाचन करण्याचा संकल्प केला. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे संचालन वर्ग 12 वि ची विदयार्थीनी तनु वाढई हिने तर प्रास्ताविक स. शिक्षक अशोक रंगारी यांनी व आभार प्रदर्शन वर्ग 11 वि चा विद्यार्थी राहुल कातोरे याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विदयार्थ्यांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले.

0 Response to "तिरुपती विद्यालय रेंगोळा येथे डाॅ. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article