समाधान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा.
शुक्रवार, 2 अक्टूबर 2026
Comment
• अधिकाधिक भागभांडवल खरेदीचे आवाहन.
सुनील जयस्वाल
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- समाधान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खापा ता. तुमसर यांची वार्षिक आमसभा नुकतीच २६ सप्टेंबर रोजी शनिवारी मोठ्या उत्साहात संस्थेच्या आवारात संपन्न झाली. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सभासदांनी अधिकाधिक भागभांडवल
खरेदी करून संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे, असे महत्त्वाचे आवाहन संस्था अध्यक्ष गोपाल ठवकर, उपाध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, संचालक बालकदास ठवकर यांनी केले. संस्थेची वार्षिक आमसभा अलीकडेच शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी सभासदांनी अधिकाधिक भागभांडवल खरेदी करावे, असा आवाहन आमसभेत करण्यात आले. संस्थेच्या गतवर्षीच्या आर्थिक उलाढालीचा व प्रगतीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोपाल ठवकर, उपाध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, संचालक अनंतलाल दमाहे, बालकलदास ठवकर, जैराम तुमसरे, देवानंद गोमासे, मुकुंदा डोंगरे, अशोक गोमासे, हरीभाऊ सोनकुसरे, लहु बोंदरे, संचालीका कौतुका
सार्वे, निशा भोयर, मुख्य व्यवस्थापक विलास तिजारे, रोखपाल उपासराव तितिरमारे, लिपीक सोनाली कहालकर, शिपाई लक्ष्मीदास ठवकर, वसुली अधिकारी आनंद तुमसरे, शिपाई अभिषेक ठवकर, शाखा व्यवस्थापक मुकेश ठवकर, शिपाई निशा बोंदरे, नित्यनिधी अभिकर्ता वंदना गोमासे, लखपती ठवकर, विनोद मने, ऋषी सिंगांडे, तुळशीदास भगत, सुषमा ठवकर, अमोल डोळस, जितेन्द्र ठवकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, अभिकर्ता व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
0 Response to "समाधान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा."
एक टिप्पणी भेजें