-->
मौदा उत्कर्ष नगर येथील एनटीपीसी कंपनीच्या विरोधात 20 नोव्हेंबर पासून अन्न त्यागआंदोलन सुरू.

मौदा उत्कर्ष नगर येथील एनटीपीसी कंपनीच्या विरोधात 20 नोव्हेंबर पासून अन्न त्यागआंदोलन सुरू.


             संजीव भांबोरे 
"साप्ताहिक"जनता की आवाज" 

नागपूर :- जिल्ह्यातील मौदा उत्कर्ष नगर एनटीपीसी येथील कंपनीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या ज्या बेरोजगारांकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहेत त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, मौदा शहर व तालुक्यातील सर्व बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, परंतु स्थानिकांना नोकरी न देता बाहेरच्या व्यक्तींना नोकरी देण्यात आल्या. तेथील फक्त जवळपास 200 बेरोजगारांना कॉन्ट्रॅक्ट बेशिकवर नोकरी देण्यात आली.

.              एनटीसीपी मध्ये उपोशन

परंतु आजपर्यंत 18 वर्षे झाले त्यांना कायमस्वरूपी करण्यात आलेले नाही . त्यामुळे 20 नोव्हेंबर 2026 पासून कंपनी व्यवस्थापनच्या विरोधात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.कंपनीमुळे कंपनीत काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांवर प्रदूषणाचा विपरीत परिणाम होत आहे .कुंभारी येथील जमिनी या एनटीपीसी कंपनीत गेलेले आहेत.

 परंतु स्थानिक लोकांना बेरोजगारांना अल्पशा रोजगार देऊन बाहेरच्या लोकांना त्या कंपनीमध्ये घेण्यात आलेले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांवर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या आंदोलनाला माजी खासदार कृपाल तुमाने, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मौदा येथील य नगराध्यक्ष तिडके, यांनी उपोषण दरम्यान भेट देऊन समस्या सोडविण्याचेउ आश्वासन दिले.

परंतु जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन सुरूच राहणार आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

0 Response to "मौदा उत्कर्ष नगर येथील एनटीपीसी कंपनीच्या विरोधात 20 नोव्हेंबर पासून अन्न त्यागआंदोलन सुरू. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article