-->
विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी पुन्हा आक्रमक.

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी पुन्हा आक्रमक.


• 'नागपुरात विदर्भ-विदर्भ म्हणतात, मुंबईत गेल्यावर विदर्भाला सवत समजतात'

• वामनराव चटप आणि छैलबिहारी अग्रवाल यांचा विदर्भातील नेत्यांवर घणाघाती हल्लाबोल.

      जिल्हा प्रतिनिधी 
          रितेश चौरे 
साप्ताहिक "जनता की आवाज"

गोंदिया :- राज्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला पुन्हा एकदा निर्णायक वळण देण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे. गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड.
विदर्भ संघ समिती 

वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, माजी विदर्भ अध्यक्ष अरुण भाऊ केदार, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. पी. आर. राऊत, डॉ. सौ. प्रज्ञाताई राजपूत, संजय केवट, अतुल सतदेवे, अरुण बत्राटे, रात्री भारद्वाज, दिलीप गौतम, भानुदास ठाकरे, वसंत गवळी, पी. एस. बिसेन यांच्यासह अनेक विदर्भवादी नेते उपस्थित होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेवर तसेच विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबाबत ठोस निर्णय न झाल्यास ही चळवळ गावागावांत पोहोचविण्या सोबतच लोकप्रतिनिधींचे घेराव आंदोलन आणि व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला.
३१ डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्याचा संकल्प समितीने जाहीर केलेल्या भूमिकेनुसार, ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्याच्या संकल्पाने विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

 १९५३ च्या नागपूर करारामध्ये विदर्भाच्या हितासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप समितीने केला. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात आंदोलन अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. ७ डिसेंबरला नागपुरात हल्लाबोल आंदोलन; २७ डिसेंबरला गोंदियात महिला संमेलन पत्रकार परिषदेत आंदोलनाची आगामी रूपरेषाही जाहीर करण्यात आली. 

समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, येत्या ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात 'नेत्यांनो, परत जा' अशा घोषणांद्वारे विदर्भातील लोकप्रतिनिधींना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या विदर्भाची मागणी मांडली पाहिजे, 

असा सवाल अग्रवाल यांनी उपस्थित केला. सिंचन, उद्योग, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भाची आर्थिक परिस्थिती हा महत्त्वाचा आधार असल्याचे समितीने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या निवेदनात राज्याचे उत्पन्न व खर्च, कर्ज, व्याजाचा वाढता बोजा, कंत्राटदारांची देणी तसेच शेतकरी आला. सध्याच्या आर्थिक व्यवस्थेमुळे विदर्भाच्या कर्जमाफीवरील खर्चाचा उल्लेख करण्यात विकासासाठी आवश्यक असलेल्या सिंचन, उद्योग, ऊर्जा, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांतील गरजा पूर्ण होत नसल्याचा दावा समितीने केला. 

विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, त्याचा शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतपरिषदेत सांगण्यात आले. 'नागपुरात विदर्भ-विदर्भ म्हणतात, छैलबिहारी अग्रवाल यांनी विदर्भातील नेत्यांवर अत्यंत मुंबईत गेल्यावर विदर्भाला सवत समजतात 'जिल्हाध्यक्ष तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी नेत्यांना स्वतःथा 'पुरुषार्थ' जागृत करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, विदर्भात असताना हे नेते 'विदर्भ-विदर्भ' असा जयघोष करतात; मात्र मुंबईत गेल्यानंतर विदर्भाशी असेअसल्याची माहिती देण्यात आली.

 ३० जूननेतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही नेत्यांनी स्पष्ट केले. विदर्भातील नेत्यांना घेराव घालुन जाब विचारणार विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप यांनी आंदोलनाला व्यापक सामाजिक पाठिंबा मिळवून देण्यासाठी विशेष रणनीती मांडली. विदर्भाच्या समर्थनार्थ कार्यरत असलेल्या विविध संघटना आणि गटांना एकत्र आणण्यासोबतच सीजेपीच्या जेन-झी समर्थकांनाही या आंदोलनाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय विदर्भातील लोकप्रतिनिधींना घेराव घालून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रश्नावर त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर मागण्यात येणार असल्याचेही पत्रकारप्रश्नावर आपली स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी करण्यात येणार आहे.
 तसेच २७ डिसेंबर रोजी गोंदिया येथे भव्य महिला संमेलन, तर १६ जानेवारी रोजी नागपूर येथे महासंमेलन आयोजित करण्यात येणार वागतात, जणू काही विदर्भ हा त्यांच्या स्वतःच्या राज्याचा भाग नसून सवतच आहे. जर विदर्भातील नेते येथील संसाधने, समस्या आणि विकासाबाबत खरोखरच गंभीर असतील, तर त्यांनी मुंबईतही तितक्याच ठामपणे स्वतंत्र असल्याचेही समितीच्या वतीने सांगण्यात आले. योतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी आणि स्थलांतराचे प्रश्न स्वतंत्र राज्याशिवाय सुटणार नाहीत!.

विदर्भातील शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर यांसारखे गंभीर प्रश्न केवळ आर्थिक पैकेज किंवा अनुदान देऊन सुटणार नाहीत, असे मत विदर्भवादी नेत्यांनी व्यक्त केले, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यास येथील नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक संसाधने आणि विकासाच्या नियोजनाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला. याच भूमिकेतून समितीने 'दान नको, अनुदान नको, आम्हाला फक्त स्वतंत्र विदर्भ राज्य हवे! हा नारा बुलंद केला. निवेदन आणि प्रतीकात्मक आंदोलनापुरती चळवळ मर्यादित राहणार नाही स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी आता केवळ निवेदने, मागणीपत्रे आणि प्रतीकात्मक आंदोलनांपुरती मर्यादित राहणार नसल्याचे समितीने स्पष्ट केले. 

जनजागृती अभियान, हल्लाबोल आंदोलन, महासंमेलन, महिला शक्तीचा सहभाग आणि लोकप्रतिनिधींचे घेराव या माध्यमांतून आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आगामी काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाईल, असा ठाम निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला. एकूणच, स्वतंत्र विदर्भ राज्याची अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी 
पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, आगामी काळात या आंदोलनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

0 Response to "विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी पुन्हा आक्रमक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article