-->
कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावीत!.

कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावीत!.


• प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांचे भंडारा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन.

देवानंद नंदागवळी 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- बहुजन समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी गावपातळीपासून बूथ व विधानसभा स्तरापर्यंत अधिक मजबूत करून पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे आणि बहुजन हिताचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी केले.
.            मार्गदर्शन करतानां प्रदेशाध्यक्ष.

बहुजन समाज पक्ष जिल्हा भंडारा यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या विदर्भ विभागीय संघटनात्मक दौऱ्यानिमित्त भंडारा येथे संघटनात्मक समीक्षा व कार्यकर्ता मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला प्रदेश उपाध्यक्ष दादाराव उईके व प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. तसेच निवडणूक नियोजन, बूथस्तरावरील संघटनात्मक बांधणी, विधानसभा स्तरावर पक्षाची ताकद वाढविणे, बहुजन समाजातील विविध घटकांना संघटित व जागरूक करणे आणि आगामी काळातील पक्षाची राजकीय व संघटनात्मक रणनीती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कुमारी मायावती यांचा जन्मदिन जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्याच्या नियोजनावरही यावेळी चर्चा करण्यात आली. पक्षाच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि संघटनात्मक विस्तार यावर विशेष भर देण्यात आला.

पक्षाची विचारधारा ही बहुजन समाजाच्या सामाजिक परिवर्तन, समता, स्वाभिमान आणि राजकीय भागीदारीच्या संकल्पनेवर आधारित असून, हा विचार केवळ सभांपुरता मर्यादित न ठेवता गावागावांत आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे ही प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. संघटनात्मक एकजूट, शिस्त आणि सक्रिय जनसंपर्काच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक व्यापक करण्याचे आवाहनही ॲड. डोंगरे यांनी केले.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष दादाराव उईके व प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापसातील समन्वय आणि एकजुटीने कार्य करून बहुजन समाजातील सर्व घटकांना संघटित करावे तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

सभेला जिल्हाध्यक्ष हेमंत घोडीचोर, भंडारा-गोंदिया लोकसभा प्रभारी संजय भिवगडे, नामदेव ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटघरे, जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र गजभिये, नाशिक चवरे, सोमेश रामटेके, निशु गजभिये, गोविंद बर्वे, कार्तिक मेश्राम, राहुल साखरे, के. एल. गजभिये, पुरुषोत्तम सहारे, जितेंद्र गजभिये, अमित रामटेके, प्रफुल रामटेके, स्वप्निल मेश्राम, नितीन मेश्राम, रवी गजभिये, रणजीत नंदा गवळी, भारत गोंडाने, योगेश वाहने, शुक्राचार्य डोंगरे, पियुष बडोले यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेच्या माध्यमातून बहुजन समाज पक्षाची संघटनात्मक बांधणी बूथपासून विधानसभा स्तरापर्यंत अधिक मजबूत करून बहुजन समाजाची राजकीय भागीदारी प्रभावी करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भंडारा विधानसभा अध्यक्ष नाशिक चवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटघरे यांनी केले.

0 Response to "कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावीत!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article