संविधान म्हणजे काय?..
रविवार, 15 नवंबर 2026
Comment
संविधान (State constitution/constitution) म्हणजे एखाद्या देशाचे किंवा संस्थेचे शासन चालविण्यासाठी तयार केलेले मूळ नियम ,मूलभूत कायदे आणि अधिकाराचा संच होय.
संविधानाची मुख्य वैशिष्ट्ये.
१) सर्वोच्च कायदा :- संविधान हा देशाचा सर्वात मोठा कायदा असतो.इतर कोणतेही कायदे संविधानाशी विसंगत असू शकत नाहीत.
२) शासनाची रचना :- देशाचे सरकार कसे चालेल. कायदेमंडळ ,कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था यांचे अधिकार व त्याचे परस्पर
संबंध कसे असतील हे संविधान ठरविते.
३) नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य :- नागरिकांना मिळणारे मूलभूत हक्क ( उदाहरणार्थ स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार) आणि त्यांची कर्तव्य यात स्पष्ट केलेली असतात.
४) सत्तेवर मर्यादा :- शासनाला किंवा सत्तेत असणाऱ्या लोकांना अमर्याद अधिकार न मिळता त्यांच्यावर कायदेशीर अंकुश ठेवण्याचे काम संविधान करते.
भारतीय संविधाना विषयी थोडक्यात
१) भारताचे संविधान :- हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
२) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर :- हे भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जातात.
संविधानिक मूल्य :- न्याय ,स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्य आहेत.
संविधानिक मूल्य :- भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत (सरनाम्यात) आणि संविधानात भारतीय लोकशाहीचे मूळ आधार असणारी प्रमुख मूल्य स्पष्ट करण्यात आली आहेत.
प्रमुख संविधानात्मक
मूल्य
१) सार्वभौमत्व :- (Sovereignty ) भारत हा देश अंतर्गत आणि बाह्य कोणत्याही परकीय सत्तेच्या दबावाशिवाय स्वतःचे निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे.
२) समाजवाद :-(Socialism ) संपत्तीचे व साधन सामुग्रीचे केंद्रीकरण रोखून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे आणि सर्वांना कल्याणचा समान अवसर देणे.
३) धर्मनिरपेक्ष (Secularism ) :- राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही आणि राज्य सर्व धर्मांना समान मानेल किंवा कोणावरही कोणताही धर्म लाभणार नाही.
४) लोकशाही (Democracy ) :- देशात सर्वोच्च सत्ता ही प्रजेच्या (लोकांच्या) हातात असून लोक निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात.
५) गणराज्यRepublic) :- देशाचा प्रमुख (राष्ट्रपती) हा वंशपरंपरेने नसून लोकांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडलेला असतो.
६)न्याय (Justice ) :- सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय उपलब्ध करून देणे.
७) स्वातंत्र्य (Liberty ) :- विचार, अभिव्यक्ती ,विश्वास, धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य.
८) समता(Equality ) :- प्रत्येक नागरिकांना दर्जाची आणि संधीचे समानता मिळवून देणे.
९) बंधुता (Fraternity ) :- सर्व भारतीयांमध्ये आपुलकी एकात्मता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा वाढविणारे बंधुभाव निर्माण करणे.
ही सर्व मूल्य भारतीय संविधानाच्या आणि इतर अभ्यासपूर्ण दस्तऐवजांमध्ये संविधानाचा आत्मा मानली गेली आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक, पनवेल
मो.८१०८०९४६५४.
0 Response to "संविधान म्हणजे काय?.."
एक टिप्पणी भेजें