बंजारा समाजाच्या समाजसेविका निर्मल आडे यांना पुण्यात राष्ट्रीय सन्मान.
बुधवार, 25 नवंबर 2026
Comment
जिल्हा विभाग विषेश प्रतिनिधी
सौ.धनश्री कपीले
साप्ताहिक"जनता की आवाज"
पुणे/भंडारा :- यवतमाळ जिल्हाातील बंजारा समाजाच्या समाजसेविका श्रीमती निर्मल रामराव आग्डे यांना 'जातीय प्रतिभा आणि सामाजिक पुरस्कार सोहळा 2026' मध्ये 'सेवा वैभव' व 'लोकसेवा सन्मान' पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सोहळा 22 नोव्हेंबर 2026 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला होता.
पुरस्काराचे स्वरूप
समाज व देशहितासाठी केलेली अभिनव व निस्वार्थ सेवा, जनसेवेतील उल्लेखनीय कार्य, एकता, मानवता आणि समाजकल्याणासाठी समर्पण यांचा गौरव करण्यासाठी निर्मल आडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येवुन त्यांना उत्कृष्टता प्रमाणपत्र देण्यात आले.
'भोगदानाध्य सन्मान' या संस्थेच्या वतीने श्रीमती निर्मल रामराव आडे यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. पुरस्कापत्रात त्यांच्या समाजसेवेतील असाधारण अविव्भाव, विशेष कार्य आणि जनसेवेसाठीचे समर्पण यांचे कौतुक करण्यात आले.
समाजासाठी स्फूर्तीदायी यश..
बंजारा समाजाच्या महिला समाजसेविव्ला राष्ट्रीय स्तरावरचा हा सन्मान मिळणे ही समाजासाठी अत्यंत आनंददायी व अभिमास्पद घटना असल्याचे यावेळी प्रतिनिधींनी सांगितले.
हा पुरस्कार केवळ बंजारा समाजाचा अभिमान नसून, समाजसेवेत सक्रिय असलेल्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
'सेवा करणे हा माझा अभिमान आहे. आदिवासी असणे हेही माझे अभिमान आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेने समाजसेवा करत राहणे हेच माझे ध्येय आहे," असे पुरस्कार विजेत्या निर्मल आच्डे यांनी याप्रसंगी म्हटले.
समाजाचे अभिनंदन..
या संधीसाठी यवतमाळ जिल्हाातील नागरिक, बंजारा समाजाचे प्रतिनिधी आणि समाजसेवकांनी निर्मल आडे यांचे अभिनंदन केले. भविष्यातही त्या समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आभार व्यक्त..
पुरस्कार मिळाल्याबद्दल निर्मल आडे यांनी आनंद व्यक्त केला. पुरस्कार प्रदान करणान्या समाजसेवक, संस्थेचे पदाधिकल्ली आणि सहयोगींप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
0 Response to "बंजारा समाजाच्या समाजसेविका निर्मल आडे यांना पुण्यात राष्ट्रीय सन्मान."
एक टिप्पणी भेजें