महंत श्री गोपालव्यास कपाटे महानुभाव यांचा भारतीय संविधान देऊन सन्मान.
बुधवार, 25 नवंबर 2026
Comment
• केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक देवानंद नंदा गवळी यांच्याद्वारे महंत श्री गोपाल व्यास कपाटे यांचा भारतीय संविधान देऊन सन्मान.
साप्ताहिक "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा/तुमसर :- महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक प्रचारक तसेच. श्रीकृष्ण ज्ञानमंदिर महानुभाव आश्रम उरळी कांचन चे संस्थापक शिवसेना अध्यात्मिक आघाडी पुण्याची अध्यक्ष अध्यात्मिक पुरोगामी अंधश्रद्धा निर्मूलन विचाराचे समाजकार्याचे धनी,ज्ञान विज्ञान,विवेक धर्माचा समतोल समाजापुढे सत्य पटवून देणारे ज्ञानसंत महंत.श्री. गोपाल व्यास कपाटे महानुभाव मुक्काम कोरेगाव मूळ उरळीकांचन पुणे हे विदर्भीय अध्यात्मिक सामाजिक प्रचार दौऱ्यावर असता,त्यांच्या अध्यात्मिक वैचारिक सामाजिक दृष्टी बघून केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्लीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक देवानंद नंदागवळी यांनी केंद्रीय मानव अधिकार संघटन दिल्ली द्वारा भारतीय संविधान देऊन सम्मान केला. व वैचारीक आशिर्वाद घेतला.
0 Response to "महंत श्री गोपालव्यास कपाटे महानुभाव यांचा भारतीय संविधान देऊन सन्मान."
एक टिप्पणी भेजें