माथनी येथे सुरू असलेला अवैध बैल बाजार तात्काळ बंद करा..
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
वंचित बहुजन आघाडीचे मौदा तालुकाध्यक्ष जगदिश वाडिभस्मे यांनी केली मागनी.
प्रदीप कडबे
साप्ताहिक"जनता की आवाज"
मौदा :- वंचित बहुजन आघाडीचे मौदा तालुकाध्यक्ष जगदिश वाडिभस्मे यांनी माथनी गावात सुरू असलेला अवैध बैल बाजार तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत तक्रार जिल्हाधिकारी नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नागपूर, उपविभागीय अधिकारी (SDO) मौदा, तहसी-लदार मौदा, पोलीस निरीक्षक मौदा, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती मौदा, गट विकास अधिकारी (BDO) मौदा यांना दिले.
पंचायत समिती मौदा, जि. नागपूर अंतर्गत येणा "या माथनी गावाच्या हद्दीत सुरू असलेला बैल बाजार हा अवैध संचालीत आहे, बाजारात विक्रीसाठी येणा "या पशुंना अनिवार्य असलेले १२ अंकी ओळख टंग नसल्यामुळे त्यांच्या मालकी, आरोग्य व ओळख याबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत, त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका इतर निरोगी पशुंना तसेच मानवांनाही आहे. अधिकृत जागा नसताना ग्रा.पं. माथनी व कृषी उत्पन्न बाजार समिती, मौदा यांच्यातील संगनमतातून बाजार सुरू असल्याचा संशय आहे. रस्त्यावर अवैध पार्किंगमुळे रहदारीत अडथळा व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
एकाच वाहनात अनेक पशुंची अमानुषपणे वाहतूक होत असून, पशुअत्याचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुंची विक्री हि कत्तलखान्याकडे होत असल्याचा संशय आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम 1963 व नियम 1967 मधील तरतुदींचे पालन होत नसल्याचे दिसून येते आहे. असे अनेक गंभीर अनियमितता व कायद्याच्या उल्लंघन होत आहे.
मागण्या..
१) सदर बैल बाजार तात्काळ बंद करण्यात यावा.
२) संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी (Inquiry Committee) नेमून करण्यात यावी.
३) दोषी अधिकारी/व्यक्तींवर काय-द्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी.
४) सर्व पशुंना अनिवार्य टंगिंग व वैद्यकीय तपासणी
बंधनकारक करण्यात यावी.
संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियंत्रण करण्यात यावे. संरक्षण विभागाच्या जमिनीचा वापर होत असल्यास, त्याबाबत स्वतंत्र चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
0 Response to "माथनी येथे सुरू असलेला अवैध बैल बाजार तात्काळ बंद करा.."
एक टिप्पणी भेजें