-->
साडीचा पदर चाकात अडकून महिलेचा मृत्यू !.

साडीचा पदर चाकात अडकून महिलेचा मृत्यू !.


• भिवखिडकी-सालई मार्गावरील दुर्घटनेने परिसरात हळहळ

      युगांतर बारसागडे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

बोंडगाव देवी :- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी-सालई मार्गावर दुचाकीच्या मागील चाकात साडीचा पदर अडकल्याने खाली पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत महिलेचे नाव सुमेधा किशोर तागडे (वय ४५, रा. माहुरकुडा, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) असे आहे. त्या पती किशोर तागडे यांच्यासोबत दुचाकीने सालई बुदुक येथे तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होत्या.

दरम्यान, भिवखिडकी शिवारातून प्रवास करीत असताना त्यांच्या साडीचा पदर अचानक दुचाकीच्या मागील चाकात अडकला. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध येथे नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे माहुरकुडा परिसरासह नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.

मृत महिलेचे पती किशोर तागडे हे वंचित बहुजन आघाडीचे अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. या प्रकरणी नवेगावबांध पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

0 Response to "साडीचा पदर चाकात अडकून महिलेचा मृत्यू !."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article