-->
खांबी येथे १५ नोव्हेंबरपासून भव्य इनामी शंकरपट !.

खांबी येथे १५ नोव्हेंबरपासून भव्य इनामी शंकरपट !.



• जय जवान, जय किसान मंडळाचा पुढाकार; प्रथम क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपयांचे पारितोषिक.

युगांतर बारसागडे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 
शकंर पट

 बोंडगाव देवी :- ग्रामीण शेतीसंस्कृती आणि पारंपरिक खेळांचा वारसा जपण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथे जय जवान, जय किसान मंडळाच्या वतीने १५, १६ व १७ वोव्हेंबर २०२६ या तीन दिवसांत भव्य इनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विभिव गावांतील नामांकित बैलजोडया सहभागी होणार असून बैलगाडी शौकिनांना वेगाचा थरार अनुभवता येणार आहे.

खांबी गावाला शंकरपटाच्या आयोजनाची जुनी परंपरा लाभली आहे, पूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे शंकरपटाचे आयोजन केले जात होते. मात्र, शासनाच्या बंदीनंतर ही परंपरा खंडित झाली होती. मागील दोन वर्षापासून गावकऱ्यांनी पुन्हा या पारंपरिक खेळाला चालना देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

या शंकरपटात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपये, द्वितीय २१ हजार १२१ रुपये, तूतीय १७ हजार ७५७ रुपये, तर अकराव्या क्रमांकापर्यत रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय विविध गटांमध्येही आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शंकरपटाचे उद्घाटन साकोली विधानसभा क्षेत्रांचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते होणार असून सहउद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्या रचनताई गहाणे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदियांचे अध्यक्षे लायकराम भेंडारकर, तर उपाध्यक्ष म्हणून आमदार राजकुमार बडोले उपस्थित राहणार आहेत. विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे.

या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल ब्राम्हणकर, उपाध्यक्ष घनश्याम लाणारे, सचिव प्रशांत खोटेले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. परिसरातील शेतकरी, बैलगाडी शोकिन आणि नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून शंकरपटाचा आनंद घ्यावा, असे
असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

पारितोषिके

१) प्रथम क्रमांकज्ञ :- २५ हजार ५५५ रुपये

२) द्वितीय क्रमांक :- २१ हजार १२१ रुपये

३) तूतीय क्रमांक :- १७ हजार ७७७ रुपये

अकराव्या क्रमांकापर्यत रोख पारितोषिके

विविध गटांमध्ये आकर्षक बक्षिसे
ठेवला आहे.

0 Response to "खांबी येथे १५ नोव्हेंबरपासून भव्य इनामी शंकरपट !."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article