-->
२६ नोव्हेंबर ला संविधान दिनी अड्याळ येथे संविधान फेस्टिवलचे आयोजन.

२६ नोव्हेंबर ला संविधान दिनी अड्याळ येथे संविधान फेस्टिवलचे आयोजन.

            नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- समतामूलक समाज युवा मंच अड्याळच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत भंडारा जिल्हा शाखेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.२६ नोव्हेंबर २०२६ ला सायंकाळी ४ वाजता बाजार ग्राउंड अड्याळ येथे संविधान फेस्टिवल २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान फेस्टिवल कार्यक्रमाचे उद्घाटन अड्याळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे यांचे हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे व्याख्याता प्रा.डॉ. लालचंद रामटेके तर प्रमुख अतिथी म्हणून अड्याळचे अप्पर तहसीलदार किशोर राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शर्मा,ग्रामपंचायत अड्याळचे सरपंच शिवशंकर मुंगाटे, उपसरपंच शंकर मानापुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मुनिश्वर बोदलकर, केंद्रप्रमुख भुवन मेश्राम, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई मुंगाटे,पंचायत समिती सदस्या सीमाताई गिरी,ग्रामविकास अधिकारी पौर्णिमा साखरे,मुख्याध्यापक गायधने , मेंढे, धुर्वे ,मुख्याध्यापिका भारती गिरडकर,सामाजिक कार्यकर्ते दिपक मरघडे, निकेश सुखदेवे,आर्यन फाउंडेशनचे संस्थापक सचिव अमित रामटेके, लोकपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रजत राऊत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या संविधान फेस्टिवल कार्यक्रमानिमित्य सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र नागपूर चे सुप्रसिद्ध मिशनरी गायक तथा प्रबोधनकार स्वप्नील मेश्राम यांचा संचाचा प्रबोधन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

संविधान फेस्टिवल 

कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहन्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मयूर खोब्रागडे,संजय मोहनकर,राष्ट्रपाल रामटेके, रंजीत कराडे, विशाल खोब्रागडे, मनीष राऊत त्याचप्रमाणे संघाचे भंडारा जिल्हा संघटक जयेंद्र चव्हाण,पवनी तालुका अध्यक्ष बळीराम रघुते,शेखर जिभकाटे लाखांदूर तालुका अध्यक्ष प्रकाश नाकतोडे, साकोली तालुका अध्यक्ष युगांतर बारसागडे,लाखनी तालुका अध्यक्ष बबलू पठाण यांनी केले आहे.

0 Response to "२६ नोव्हेंबर ला संविधान दिनी अड्याळ येथे संविधान फेस्टिवलचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article