बाबासाहेब देशाची शान.
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
बाबासाहेब तुम्ही
जगी वाढविली
देशाची शान
तुमच्यामुळेच भारत
झाला महान!!
बाबासाहेब पाण्यासाठी
तुम्ही केला
महाडचा चवदार
तळ्याचा मुक्तिसंग्राम
जगी भागविली
वंचितांची तहान!!
बाबासाहेब तुम्ही
भारतीय सामाजिक
समतेसाठी केला
काळाराम मंदिर
नाशिकचा सत्याग्रह
सर्वांसाठी खुले केले
मंदिराचे दालन!!
बाबासाहेब तुम्ही
चंदनापरी झिजून
जनतेच्या कल्याणासाठी
डोळ्यांची करून पणती
लिहिले देशाचे संविधान!!
डॉ.नागनाथ डोलारे
जेष्ठ साहित्यिक, पनवेल
0 Response to "बाबासाहेब देशाची शान."
एक टिप्पणी भेजें