राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे रविवार, 13 जुलै रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
शनिवार, 12 जुलाई 2025
Comment
भंडारा :- राज्यपाल हरिभाऊ बागडे हे सकाळी 9.20 वाजता नागपूर येथील राजभवनातून साकोली तालुक्यातील भारत सभागृहासाठी प्रयाण करतील. सकाळी 10.55 वाजता त्यांचे भारत सभागृह, नागझिरा रोड साकोली, येथे आगमन होईल.त्यानंतर सकाळी 11.00 वाजता डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.दुपारी 12.30 वाजता वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 2.00 वाजता ते यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहासाठी प्रयाण करतील.
0 Response to "राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे रविवार, 13 जुलै रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर"
एक टिप्पणी भेजें