-->
संत श्रीपादबाबांच्या जीवनावर आधारित लघुपट प्रदर्शित – विकास वायाळ यांची प्रमुख भूमिका

संत श्रीपादबाबांच्या जीवनावर आधारित लघुपट प्रदर्शित – विकास वायाळ यांची प्रमुख भूमिका

संजीव भांबोरे
भंडारा :- वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत श्रीपादबाबा चव्हाण ( घोटी गाव तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक)यांच्या जीवनावर आधारित सत्यघटनेवर आधारित एक भावस्पर्शी लघुपट नुकताच 6 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पोस्टरचे उद्घाटन होऊन सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. या लघुपटात संत श्रीपादबाबांची भूमिका लेखक सह दिग्दर्शक व अभिनेता विकास वायाळ यांनी प्रभावीपणे साकारली आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शक- श्री संजय कसबेकर सर यांनी केले असून, श्रीपादबाबांच्या भक्तिमय जीवनातील संघर्ष, त्यांचे समाजासाठीचे योगदान आणि त्यागमय वृत्तीला प्रामाणिकपणे पडद्यावर उतरवले आहे. पारंपरिक वारकरी भावविश्व, भजन, कीर्तन, आणि भक्तिरसाने भरलेली ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरली आहे.
लघुपटाचे सोशल मीडियावर प्रदर्शन होताच अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विशेषतः वारकरी भक्तांनी याचे स्वागत भक्तिभावाने केले आहे. नव्या पिढीला संतपरंपरेची जाणीव करून देण्यासाठी हा लघुपट एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरत आहे.या लघुपटाचे पटकथा /संवाद /सहदिग्दर्शक लेखक श्री विकास वायाळ दिग्दर्शक- श्री संजय कसबेकर सर डी ओ पी- श्री धनराज वाघ सर कथा- ह भ प श्री बाळासाहेब महाराज चव्हाण ( घोटी) ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज रायजाधव ( बदलापूर ठाणे)
कलाकारसंत श्रीपाद बाबा श्री विकास वायळ,संत रामदास बाबा श्री पांडुरंग चिकणे, संत केरोबा बाबा श्री किरण गायकर, ह भ प मामासाहेब दांडेकर ह भ प श्री शिवाजी टेमकर,ह भ प कोंडाजी बाबा डेरे,ह भ प श्री धोंडीभाऊ शिंदे सर,संत गाडगेबाबा श्री अशोक वायळ,मा. ना. श्री यशवंतराव चव्हाण,श्री वैभव वायळ,सौ जाईबाई श्रीपाद चव्हाण,कादंबरी, सहकलाकार,कु श्रुतिका पाटील,कु चंदना झाडे,कु श्रावणी सुरेश हगवणे,कु,स्वरा वैभव वायाळ,श्री संतोष शिवदास आमले,श्री सुरेश भोईर
विशेष आभार, श्री काळभैरवनाथ फिल्म प्रोडक्शन,दादासाहेब फाळके चित्रपट युनियन,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद 
मीडिया पार्टनर -दैनिक युवक आधार 
,आषाढी एकादशी निमित्त रविवार दिनांक 6 जुलै रोजी 
वारकरी संत श्रीपाद बाबा एका सत्य कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे आपण पाहू शकता यूट्यूब चैनल Vikas wayal वरती
सर्वांनी सदर लघु चित्रपटाची युट्युब लिंक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप ग्रुप सर्वीकडे शेअर करा शक्य असल्यास सदर लघु चित्रपटाचा पोस्टर व लिंक डीपी स्टेटस ला ठेवा असे आव्हान अभिनेता विकास वायाळ यांनी केले

0 Response to "संत श्रीपादबाबांच्या जीवनावर आधारित लघुपट प्रदर्शित – विकास वायाळ यांची प्रमुख भूमिका"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article