
सेवानिवृत्ती सत्कार समारंभ
"साप्ता."जनता की आवाज"
पालांदूर :- स्थानिक श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथे नुकताच सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न झाला. वैनगंगा बहुउद्देशीय झाले विकास संस्था ,नागपूर द्वारा संचालित या महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रदीप दहिकर आणि कनिष्ठ लिपिक श्री. यादव कडूजी अलोणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ महाविद्यालय सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सोमदत्त करंजेकर अध्यक्ष वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था हे होते तर अतिथी म्हणून आणि सत्कारमूर्ती म्हणून डॉ. प्रदीप दहीकर, प्राचार्य, सौ. प्रज्ञा प्रदीप दहिकर, श्री यादव कडूजी अलोने, सौ लता यादव अलोणे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश लांजेवार उपप्राचार्य यांनी केले प्रास्ताविकातून सत्कारमूर्तींच्या परिचय आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे मनोगत झाले तर वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेला प्रगतीपथावर नेण्याकरिता डॉ. प्रदीप दहिकर यांनी केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता अध्यक्ष स्थानावरून डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. रवी पाटेकर लिखित बाल कामगारांच्या आर्थिक व सामाजिक समस्या या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजयकुमार निंबेकर तर आभार डॉ. रवी पाटेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. नितीन थुल, डॉ राजेंद्र खंडाईत, डॉ रमेश बागडे, प्रा. प्रमोद शेंडे, डॉ. दीपक अंभोरे, प्रा. मनोज मोहतुरे ,श्री महेश गुरखे श्री जहांदर बख्त,प्रा. संगीता सेलोकर,प्रा. रोहिणी कोचे, श्रीमती जया कोडापे,श्री भरत घरडे ,श्री अनिल शहारे, यांनी सहकार्य केले.
0 Response to "सेवानिवृत्ती सत्कार समारंभ "
एक टिप्पणी भेजें