-->

Happy Diwali

Happy Diwali
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार -माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार -माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे




"साप्ता.जनता की आवाज"
संजीव भांबोरे 
भंडारा - आपण निवडणूक दरम्यान आपल्या पक्षाच्या घोषणापत्र मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचे आश्वासन दिले होते .परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. अतिदृष्टी ,अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, धान उत्पादन वाढता खर्च, अशा अनेक कारणापायी राज्यातील शेतकरी कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिकच वाढत आहे. विधानमंडळाच्या सन 2024 च्या हिवाळी अधिवेशनात नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो अशा धान उत्पादकांना हेक्टरी 20000 हजार याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी बोनस देण्याची घोषणा केली होती व दिनांक 25 मार्च 2025 रोजी प्रोत्साहन पर राशी देण्याबाबतचे पत्रक सुद्धा काढण्यात आले. परंतु अजून पर्यंत नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस चे पैसे देण्यात आले नाही . बोनसचे पैसे तात्काळ नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे ह्या प्रमुख मागणीसह खालील मागण्यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर 14 आगस्ट 2025 पासून धान उत्पादन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल. यात प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, नागपूर हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे धान उत्पादन नोंदणीकृत शेतकऱ्यांना तात्काळ बोनस देण्यात यावे ,उन्हाळी धानाचे चुकारे देण्यात यावे व धान खरेदीची मुदत वाढविण्यात यावी याबाबतचे निवेदन माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

 जिल्हाधिकारी भंडारा, नागपूर, पोलीस आयुक्त नागपूर शहर नागपूर ,तहसीलदार तहसील कार्यालय लाखांदूर, पोलीस निरीक्षक सीताबर्डी पोलीस स्टेशन नागपूर ,पोलीस निरीक्षक शंकर नगर पोलीस स्टेशन नागपूर ,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन दिघोरी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातून केलेली आहे.

0 Response to " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार -माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article