-->
 पहेला ते चिखलपहेला या  2 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

पहेला ते चिखलपहेला या 2 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

  • खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा

संजीव भांबोरे 

भंडारा :- भंडारा तालुक्यातील पहेला कडून चिखलपहेला कडे जाणाऱ्या या 2 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचलेला आहे. खड्ड्यात रस्ता ती रस्त्यात खड्डा हेच कळत नाही .या रस्त्याने साधी टू व्हीलर, सायकल ,चालवणे कठीण आहे. रस्ता जागोजागी फुटलेला असून डांबरीकरण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पाणी साचलेला आहे. आता जनतेने आपले वाहन कुठून चालवावे हेच त्यांना कळत नाही. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार ,खासदार ,यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणारी त्रास थांबवून ही समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.

0 Response to " पहेला ते चिखलपहेला या 2 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article