-->
 पवनी आगाराला मिळाली नवीन 'लाल परी'

पवनी आगाराला मिळाली नवीन 'लाल परी'

  • आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या हस्ते लोकार्पण!

पंकज वानखेडे

पवनी : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पवनी आगाराला आज, ६ जुलै रोजी एक नवीन 'लाल परी' (एस.टी.बस) मिळाली. भंडारा/पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते थाटामाटात या बसचा लोकार्पण सोहळा पार पडला.

सकाळपासूनच आगारात उत्साहाचे वातावरण होते. फुलांनी आणि माळांनी सजवलेल्या या अत्याधुनिक बसचे फीत कापून आमदार भोंडेकर यांनी लोकार्पण केले. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण राज्य परिवहन भंडारा विभागाच्या विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर, यंत्र अभियंता श्री. खवळे आणि कामगार अधिकारी तथा पालक अधिकारी श्री. शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रादेशिक अभियंता महेंद्र नेवारे यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच, पवनी आगारातून पहिली बस घेऊन जाण्याचा मान मिळालेले चालक मारुती रिणके यांचाही सत्कार आमदार भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्रादेशिक अभियंता महेंद्र नेवारे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रवाशांच्या सोयीसाठी पवनी आगाराला अधिक बसेसची आवश्यकता असल्याचे नमूद करत नवीन बसेसची मागणी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला पवनी तालुक्यातील समस्त शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार ब्रम्हदास बागडे, हरिश्चंद्र भाजीपाले, प्रदीप घाडगे, अशोक गिरी, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे समस्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांत्रिक कर्मचारी दीपक रामटेके यांनी केले, तर आगाराचे व्यवस्थापक किरण चोपकर यांनी आभार प्रदर्शन केले. वाहतूक निरीक्षक कुंदन मिश्रा, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अल्केश पशिने, आणि आगार लेखापाल मोरेश्वर घोडपागे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

0 Response to " पवनी आगाराला मिळाली नवीन 'लाल परी'"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article