.jpeg)
40 दिवसात पहिल्याच पावसात भंडारा शहर नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची दुरावस्था सगळीकडे खड्डेच खड्डे.
- भंडारा नगर परिषद सीईओ, भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी PWD यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
- खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी केली भंडारा शहर रस्त्याची पाहणी.
संजीव भांबोरे
भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी आज दिनांक7 जुलै 2025 ला भंडारा शहर रस्त्याची पाहणी केली.1 महिन्या अगोदर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या वॉर्डमधील रस्त्याची पाहणी केली होती. वॉर्डातील समस्या जनतेच्या ऐकून घेतल्या. त्याच वेळी नगर परिषद सीईओ भंडारा यांना सूचना केल्या होत्या.
आता एक महिन्याअगोदर नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम आणि काही रस्त्याचे नूतनीकरण केले.
परंतु एका महिन्यातच शहराच्या रस्त्याची पहिल्याच पावसात अशी परिस्थिती झाली याला जिम्मेदार कोण असेल ? असा प्रश्न पडतो आहे. याला जबाबदार भाजप सरकार की त्यांचे नगर परिषद भंडारा येथील सीईओ .तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी PWD, हे आहेत.
शास्त्री चौक ते टाकडी पर्यंत रस्त्याचे अधुरे काम, शास्त्री चौक ते मेंढा, आंबेडकर वॉर्ड, चांदणी चौक रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे सामान्य रुग्णालय ते महात्मा फुले मार्केट, अशोका हॉटेल मेन रोडला खड्डेच खड्डे
डॉ.चोलेच्या हॉस्पिटल समोर खड्डेच खड्डे , नागपूर नाका ते राजीव गांधी चौक रस्त्याचे अधूरे काम,
आणि अजून पर्यंत इलेक्ट्रिक पोल काढले गेले नाहीत.
हनुमान नगर, तकिया वार्ड ते म्हाडा कॉलोनी खात रोड भंडारा पर्यंत रस्त्याला खड्डे खड्डे,
रुख्मिणी नगर ,खात रोड भंडारा येथे अजूनही नगर परिषद अंतर्गत रस्ता तयार केला नाही.
भंडारा शहराची रस्त्याची पाहणी केली. जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ नगर परिषद सीईओ भंडारा, भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी PWD यांचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येत आहे. यांना वारंवार सूचना करून सुद्धा जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्यास खपवून घेणार नाही. जनतेचा अंत पाहू नका, तात्काळ रस्त्याची आणि खड्याची डागडुजी करा. संबंधित काम केलेले कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करा, सबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कार्यवाही करा. या कॉन्ट्रॅक्टरने शहरातील अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे तयार केले आहेत.
या कॉन्ट्रॅक्टची रस्ते निकृष्ट तयार करण्यासाठी शहरातच सोडा तर भंडारा, तिरोडा, गोंदिया मधे चांगलीच चर्चा रंगत आहे. फक्त नगर परिषद सीईओ भंडारा हे चांगलीच पाठराखण करीत असतात. या दोघांचे नाते अतिरिक्त घट्ट आहे असे दिसते. पण लवकरच माहिती पडेल निकृष्ट दर्जाचे कामाचे काय ?
कशी कार्यवाही आणि चौकशी होत नाही या कामाची ते पण आता पाहण्याची वेळ आली. ते शहरातील जनतेसमोर उघड काढतो.
असेही यावेळी जिल्हाधिकारी भंडारा, नगर परिषद सीईओ भंडारा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी PWD भंडारा यांना संपर्क करून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी सूचना केल्या. त्या कामाची चौकशी करा असेही सांगितले.
0 Response to "40 दिवसात पहिल्याच पावसात भंडारा शहर नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची दुरावस्था सगळीकडे खड्डेच खड्डे."
एक टिप्पणी भेजें