दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर को-ऑपरेटिव बँक शाखा साकोली बँकेतून बोगस सही करीत खात्यातून ९६ हजार 500 रुपये काढले
गुरुवार, 24 जुलाई 2025
Comment
• त्या" व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करा
• शिवसेनेचे तहसिलदारांना निवेदन ,सानगडीतील प्रकार ,सीसीटीव्ही फुटेज तपासा
संजीव भांबोरे
भंडारा- दि भंडारा डिस्ट्रिक सेन्ट्रल को ऑप बँक शाखा साकोली मध्ये खातेदाराच्या खात्यामधून बोगस स्वाक्षरी करून पैशाची उचल करणाऱ्या व्यक्ती वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेने ( बुध. २३ जुलै ) ला तहसिलदार निलेश कदम यांना निवेदन सादर केले. याप्रकरणी यात बॅंक कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा प्रकार घडला असावा अशी शंका व्यक्त केली असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
शेतकरी खातेदार कारनदास बारसागडे रा. कुंभली यांच्या बचत खात्यामधून ९६५००/- रुपये दि भंडारा डिस्ट्रिक सेन्ट्रल को ऑप बँक शाखा सानगडीच्या शाखेमधून बेकायदेशीररित्या काढण्यात आले. विशेष म्हणजे खातेदाराचे खाते हे साकोली शाखेमध्ये आहे. आणि पैसे काढणाऱ्या सदर व्यक्तीने खातेदाराच्या सही शिवाय सानगडी शाखेमधून पैसे काढले, हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, त्यामुळे बँकेमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर बोगस व्यक्तीवर कार्यवाही करावी आणि या अगोदर अश्या किती बोगस प्रकरणात या व्यक्तीचा समावेश आहे. याबद्दल गुन्हे शाखेमार्फत चौकशी करून ७ दिवसात अश्या बोगस व्यक्तीवर फौजदारी गुन्हा नोंदवावा. अन्यथा साकोली तालुका शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याला आपण स्वतः जवाबदार राहाल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याची प्रतिलीपी प्रत जिल्हाधिकारी भंडारा, जिल्हा बँक व्यवस्थापक दि भं. डी. सें. को ऑप बँक, मुख्य शाखा भंडारा, जिल्हा निबंधक भंडारा व सहाय्यक निबंधक साकोली यांना देण्यात आले.
यादरम्यान शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र वाडीभस्मे, उमेध गोडसे, राधेश्याम मुंगमोडे, बंडू शेंडे, पुष्कर करंजेकर, सचिन घोनमोडे, सचिन करंजेकर हे हजर होते. येथे शिवसैनिकांनी म्हणाले की, अन्नदाता शेतकरी हा शेतात घाम काढून राब राब राबतो आणि कष्टाळू शेतकऱ्यांसोबतच हा ४२० फसवणूकीच्या प्रकारात अखेर कोण कोण सामिल झाले आहेत.? बोगस सही करीत खात्यातून ९६ हजार ५०० रूपये काढणारा "तो" व्यक्ती कोण याची गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी करून त्यावर फसवणूकीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
0 Response to "दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर को-ऑपरेटिव बँक शाखा साकोली बँकेतून बोगस सही करीत खात्यातून ९६ हजार 500 रुपये काढले"
एक टिप्पणी भेजें