गोविंद विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी
शनिवार, 12 जुलाई 2025
Comment
पालांदूर :- गोविंद विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माननीय आ.बा .मदनकर सर ,प्रमुख वक्ते श्री माधवजी नवखरे सर आणि पर्यवेक्षिका घाटबांधे मॅडम तसेच प्राध्यापक बारसागडे सर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता ,भारत माता तसेच बापूसाहेब लाखनीकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला करून करण्यात आले .
विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा व गुरु बद्दल भाषणातून व गीतातून महती सांगितली तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी व प्रमुख वक्त्यांनी गुरुपौर्णिमा, गुरुचे जीवनातील महत्त्व याबाबतीत महत्त्वाचे मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे संचालन श्री पियुष वंजारी सर तर आभार श्री. बारसागडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Response to "गोविंद विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी"
एक टिप्पणी भेजें