-->
 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा बायपास चे उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा बायपास चे उद्घाटन

  • बायपास मुळे वाहतूक सुलभता होईल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

संजीव भांबोरे 

भंडारा - दिनांक 5 जुलै 2025 ला राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 14.8 किलोमीटर लांब भंडारा बायपास भंडारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होता .नागपूर- रायपूर -कोलकत्ता महामार्गावरील जड वाहने यापूर्वी भंडारा शहरातील दुपदरी मार्गावर जात होते. ज्यामुळे अधिक विलंब व अधिक इंधन खर्च होऊन अपघातांच्या धोका निर्माण होत होता .भंडारा बायपास मुळे वाहतूक सुलभ होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. महर्षी विद्यामंदिर मैदानात आयोजित लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ प्रशांत पडोळे, भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके ,आमदार संजय पुराम ,आमदार राजू कारेमोरे ,माजी खासदार सुनील मेंढे ,जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते ,पोलीस अधीक्षक नुरल हसन उपस्थित होते .

भंडारा बायपास हा हरित शेत्र ग्रीन फील्डमध्ये सर्विस रोड उड्डाणपूल आणि अंडर पास सह तयार करण्यात आलेला आहे .ज्यामुळे स्थानिक आणि दूरच्या वाहतुकीच्या प्रवासाचे विभाजन करून प्रवास सुरळीत करतो. यासोबत वन्यप्राणी व वाघांच्या मार्गाच्या विचार करून अंडर पास ध्वनी अवरोधक सोबत चेंज लिंक फेसिंग यांचा समावेश केलेला आहे .

तत्पूर्वी आज सकाळी नागपूर जिल्ह्याच्या भंडारा रोडवरील मौदा वाईट जंक्शन येथे असलेल्या सहा पदरी उद्यान पुलाचे लोकार्पण केले. या पुलाची लांबी 1.44 किलोमीटर असून सुमारे 84 कोटी रुपयांच्या तरतुदीने हा पूल बांधण्यात आलेला आहे .या उड्डाणपूलामुळे मौदा वाय जंक्शन वरील वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन येथील दुर्घटना करणार आहेत. यावेळी त्यांनी उड्डाणपूलाच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी रामटेकचे खासदार श्याम कुमार

बर्वे तसेच विधान परिषदेतील आमदार परिणय फुके उपस्थित होते. आज मानेगाव येथील व्हेहीकुलर ओवर पास व ब्लॅक स्पॉट सुधारणा लांबी 1.9 किलोमीटर बपेरा ते तुमसर राज्य मार्ग लांबी 18 किलोमीटर आणि खापा ते भंडारा राज्य मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण लांबी 28 किलोमीटर या तीन कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. तसेच भंडारा बायपास व मौदा वाय जंक्शन सहा लेन उड्डाणपूल या दोन विकास कामाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. सकाळी वैनगंगा नदीवर पूजन व भंडारा बायपासची पाहणी केल्यानंतर महर्षी विद्यामंदिर येथील कार्यक्रमात ते उपस्थित होते. 

यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे

, माजी खासदार सुनील मुंढे आणि आमदार सर्वश्री नरेंद्र भोंडेकर ,परिणय फुके यांनी मार्गदर्शन केले. स्वागत समारंभात महर्षी विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादरीकरण केले .कार्यक्रमाची प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एच एमस सिन्हा यांनी केले. प्रकल्पाची संक्षिप्त टिपणी भंडारा बायपास उद्घाटन कामाचे नाव एन एच 53 च्या किलोमीटर 485.00 ते किलोमीटर 499.800 पर्यंत सहा पदरी भंडारा बायपासचे बांधकाम, प्रकल्पाची एकूण किंमत ७३५.०० करोड, प्रकल्पाची लांबी 14.800 किलोमीटर, कराराच्या दिनांक 27 जानेवारी 2022, काम सुरू करण्याच्या दिनांक सहा एप्रिल 2022, कॉन्ट्रॅक्टदाराचे नाव स्वामी समर्थ इंजिनियर्स लिमिटेड पुणे, कार्य देखरेख पीपीएफ इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड, वाहतूक 28 हजार 564 पीसीयू, प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये, मुख्य रस्ता सहा पदरी मार्ग, डिझाईन वेग 100 किलोमीटर घंटा, बायपासची लांबी 1034 किलोमीटर, सर्विस स्लीप रोड रुंदी 7 मीटर एकूण लांबी, 46 किलोमीटर दोन्ही बाजूस पक्की ड्रेनेज सहित, उड्डाणपूल दोन कार्डा येऊ अशोक नगर जंक्शन वर, कारदा-1,x24.00+1x30.00+1x24.00 मीटर, अशोकनगर1,x24.00+1x30.00+1x24.00, मिटर वाहन अंडरपास 17, वन्य प्राण्यांसाठी अंडरपास दोन भिलवाडा येथे प्रत्येक 2x24 मिटर प्यान, प्रमुख पूल_ 3 वैनगंगा नदी 700 मीटर गोसीखुर्द, छोटे पूल -3,

प्रकल्पाची सुविधा बस बे आणि स्टेटस-6 ठिकाणी दोन्ही बाजूस -चांदोली, भिलेवाडा ,पिपरी ,सालेबर्डी, खापा ,मुजबी, ट्रीट लाइटिंग-मुख्य रस्ता आणि सर्विस रोडवर, हाई मास्टर-उड्डाणपूल आणि मुख्य चौरस्त्यावर, मध्य व रोडच्या बाजूस वृक्षारोपण, वन्यजीव मार्गावर मे चेन लिंक हे सिंग सहित ध्वनी अव रोधक लावण्यात आले आहे. 

प्रकल्पाचे लाभ-भंडारा जिल्हा रस्ता सुरक्षा समिती द्वारे चिन्हांकित केलेले ब्रेक स्पार्ट बलाडी आणि भिलवाडा मध्ये मार्गाच्या बांधकामामुळे समाप्त करण्यात आले आहे. नागपूर ते रायपूर व छत्तीसगड राज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक वाहनासाठी सुधारित जोडणी, वैनगंगा नदीवर नवीन सापदरी उड्डाणपूलामुळे भंडारा शहरातील होणारा वाहतुकीच्या अडथळा दूर करण्यात आला, भंडारा शहरात सुलभ व सुरळीत वाहतूक, या प्रकल्पामुळे पूर्वीच्या दुर्गम शेती पट्ट्यांना चांगली जोडणी झालेली आहे.

0 Response to " केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भंडारा बायपास चे उद्घाटन "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article