तालुका जागृती युनिट ची स्थापना.. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण*
सोमवार, 21 जुलाई 2025
Comment
नरेन्द्र रामटेके
भंडारा :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत तालुका स्तरावर तालुका विधी सेवा समिती लाखनी मार्फत दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर लाखनी येथे "तालुका जागृती युनिट"ची स्थापना करण्यात आले. या युनिट चे अध्यक्ष व सर्व सदस्यांची बैठक दिनांक १८/०७/२०२५रोज शुक्रवार ला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर लाखनी येथे ठीक२:१५ दुपार ला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर लाखनी येथे पार पडली. "तालुका जागृती युनिट"चे पदसिद्ध अध्यक्ष मा.एफ.के.सिद्दीकी, अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर लाखनी व सदस्य म्हणून लाखनी तालुक्याचे मा. तहसीलदार श्री. धनंजय देशमुख, मा. पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन लाखनी, मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती लाखनी, अँड.आर. एम. भुसारी, अँड. खुशबू हुकरे, श्री चेतन सूर्यवंशी(अधिकार मित्र),श्री. गोपाल तलमले (अधिकार मित्र), सौ. अश्विनी भिवगडे (अधिकार मित्र), कु. हर्शिला बडोले (अधिकार मित्र), मा.पोस्ट कार्यालय अधिकारी लाखनी, मा. नियंत्रक बस स्टँड लाखनी, मा.शाखा व्यवस्थापक एस. बी. आय. बँक लाखनी हे आहेत. यावेळी सर्व सदस्यांची बैठक तालुका जागृती युनिट चे मा. अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी ग्रामीण व शहरी आणि शालेय पातळीवर फोपावत चालले सामाजिक समस्या,दुष्कृत्य त्यावर आडा बसण्या करीता प्रतिबंधित कायदे आणि विधी संघर्षीत आर्थिक व सामाजिक दुर्बल व्यक्ती ला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ,भंडाराआणि तालुका विधी सेवा समीती लाखनी तर्फे मोफत विधी सेवा पुरविले जातात.अशा शासकीय योजना बाबद माहिती समीती चे अध्यक्ष म्हणून मा.एफ. के.सिद्धीकी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर.लाखनी यांनी दिली.तसेच स्थानिक पातळीवर या योजना विषयी माहिती "तालुका जागृती युनिट"च्या माध्यमातून दिले जाणार त्या करीता माहिती फलक,कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर चे आयोजन करून दिली जाते.असे विविध विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले.
0 Response to "तालुका जागृती युनिट ची स्थापना.. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण*"
एक टिप्पणी भेजें