-->

Happy Diwali

Happy Diwali
 वाघाच्या हल्ल्यात एक म्हश ठार तर एक गंभीर जखमी.

वाघाच्या हल्ल्यात एक म्हश ठार तर एक गंभीर जखमी.

  • चारभट्टी जंगल परिसरातील घटना
  • पशु मालकाचे 80 हजाराचे नुकसान.



नरेन्द्र मेश्राम

भडांरा :- लाखांदूर तालुक्यात ग्राम  बारव्हा सर्वत्र वाघाच्या धुमाकुळाने त्रस्त असताना दैंनदिन घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशातच लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील पशुमालक रोजच्या प्रमाणे म्हशी चराईसाठी जंगल परिसरात घेवून गेला होता.अश्यातच म्हशींवर वाघाने हल्ला चढवीत एक म्हश ठार तर एक म्हश गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १७ जुलै रोजी घडली असून, रविवारी सकाळी २० जुलै रोजी उघडकीस आली. मंगेश गोपीनाथ लांडगे (३७) रा. पुयार असे पीडित पशुमालकाचे नाव आहे.

         प्राप्त माहितीनुसार,रोजच्या प्रमाणे पुयार येथील पशुमालक आपल्या म्हैस चराईसाठी चारभट्टी जंगल परिसरात नेत असतात. यावेळी अनेक पशुमालकाचे गायी, म्हशी, शेळ्या चराईसाठी असतात. दरम्यान, १७ जुलै रोजी पुयार येथील पशुमालक मंगेश लांडगे व धनराज राऊत यांनी आपल्या म्हशी चराईसाठी चारभट्टी जंगल परिसरात नेल्या होत्या. मात्र, दुपारच्या सुमारास पशुमालक जेवण करत असताना मंगेश लांडगे यांच्या म्हशीला वाघाने हल्ला चढवीत गंभीररीत्या जखमी केले. त्यावेळी वाघांना पाहून दोन्ही पशुमालकांनी धाव घेतली त्यावेळी वाघाने माघार घेतली. त्यावेळी पशुमालकांनी आपल्या म्हशींचा कळप गोळा केला. मात्र, एक म्हश मागे राहिल्याने तिच्यावर वाघाने हल्ला चढवीत तिला जंगल भागात आतमध्ये ओढत नेले. यावेळी सायंकाळ झाल्याने पशुमालकांना म्हशीला शोधणे शक्य नव्हते.

          दरम्यान, दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी पशुमालकांनी जंगल परिसरात त्या म्हशीचा शोध कार्याला सुरुवात केली. पण त्या म्हशींचा काही थांगपत्ता लागला नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी पुन्हा शोध कार्य सुरू केले. मात्र, तेव्हा पण काही आढळला नाही. याच दिवशी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील मेंढा येथील एक पशुमालक आपल्या शेळ्या, गायी चराई करताना एका म्हशीचा मृतदेह आढळून आला. आपल्या गावी परतल्यावर त्याने मेंढा येथील एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीद्वारे पुयार येथील पशुमालक मंगेश लांडगे यांना कळविले. माहितीवरून मंगेश लांडगे यांनी माझीच म्हश असल्याचे प्राथमिक माहिती झाली.

   दरम्यान, २० जुलै रोजी रविवारी सकाळी मेंढा येथील जंगल परिसरात मेंढा येथीलच पशुमालकाला सोबत घेऊन पशुमालक,  काही नागरिकांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन, ती म्हश पशुमालक मंगेश लांडगे यांनी माझीच आहे असे कबुल केले. या दुर्घटनेत  पशुमालकाचे ८० हजार रुपयांच्या नुकसान झाले असून, नुकसान भरपाई देण्यात मागणी गावकऱ्यांनी केली जात आहे. तसेच या वाघामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

     सदर घटनेची माहिती वनविभागाला होताच येथील वनपरीक्षेञाधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनात  येथील वनरक्षक डी. एस. कडव  घटनास्थळी पोहचुन घटनेचा पंचनामा केला. 

  पंचनामा करतेवेळी वनमजुर, पशुमालक, नागरिक उपस्थित

प्रतिक्रिया 

        - वाघाच्या हल्ल्यात माझी एक म्हश ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. ती म्हश आमच्या घरातील सदस्या प्रमाणे होती. पण तिचा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याने माझ्या मनात दुखः आहे. आणि मोठी नुकसान पण झाली आहे. मात्र, यासमोर असल्या प्रकारच्या कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वनविभागाने उपाययोजना करून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. चारभट्टी जंगल परिसरात २ ते ३ वाघ वास्तव करीत असताना दिसत आहेत.

0 Response to " वाघाच्या हल्ल्यात एक म्हश ठार तर एक गंभीर जखमी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article