नाशिक चवरे बहुजनरत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.
भंडारा :- जिल्ह्यातील पिपरी (पुनर्वसन) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कवी व अष्टपैलू आदर्श व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणून परिचित असणारे समाज मित्र नाशिक चवरे यांना नुकतेच राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार सन्मानाने सन्मानित करण्यात आले. नाशिक चवरे हे व्यवसायाने दस्तलेखक असून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आहेत. या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थी जीवनापासून सामाजिक कार्य करीत आहेत. आपल्या लेखणीतून व कवितांच्या माध्यमातून सातत्याने समाजप्रबोधनाचे व बहुजन मानवतावादी महापुरुषांच्या विचारांचा राष्ट्र घडावा या ध्येयाने समाज जागृतीचे कार्य करीत आहेत. सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली, तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, सुलोचना माहेरघर (महिला आश्रम )लताई बाल अनाथालय भोकर. ता.चिखली, जिल्हा बुलढाणा या नामवंत संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सन्मान सोहळ्यात, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त व बहुजन नायक कांशीरामजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मान कर्तुत्वाचा....सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार बहुजनवादी विचारवंत अँड साहेबराव सिरसाट व संस्थेचे मुख्य आधारस्तंभ प्रशांत डोंगरदिवे यांच्या हस्ते मुकुंद सोनवने, प्रभात खिल्लारे, वैभव गीते, डॉ. सुभाष राऊत, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक चवरे यांना सन्मानपत्र , सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही त्यांना अनेक नामवंत संस्थांनी विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे . यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील चाहत्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Response to " नाशिक चवरे बहुजनरत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित."
एक टिप्पणी भेजें