नामकरणाचा पाळणा(चाल ,,राग: पहाडी )(चाल कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर)
रविवार, 24 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
संकलित
चंदणाच्या पाळण्याला - रेशमाची दोरी
हलवू या ग या बाळाला - पांच पांच पोरी ।।धृ.।।
बाळ माझा गोजीरवाणा - पाही टूक टूक
रडतो केवील वाणा - आली ग चकुरी... 1
नांव ठेऊ या बाळाचे, सजले हे घर
देण्या झोके बाळाला तु, हाती घेग दोरी ...2
गायणाला पाळणे गित ,जमा झाली टोळी
गुब्बाऱ्यानी सजविली, पाळण्याची दोरी...3
बाळाला या आशीर्वाद, देती सारे जण
घालू या बाळाला आता ,,शेरवाणी कोरी ...4
फुलूनिया आले बाई, माझे हे ग मन
वाढू पेढे, लाडू आणि,वरण,भात,पोळी ...5
आज या सोहळ्याला, गांव गोळा झाला
शिला नामकरणाला, 'गौतमाची वारी ...6
गौतम धोटे
९६३७७०८५९३
लोककवी,पत्रकार
(आवापुर)
0 Response to "नामकरणाचा पाळणा(चाल ,,राग: पहाडी )(चाल कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर)"
एक टिप्पणी भेजें